जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
ग्रामविकास हा देश विकासाचा पाया आहे, हा दुरदृष्टीकोन ज्या संतांचा होता असे तुकडोजी महाराज. भारतात ग्रामीण भाग सर्वात जास्त आहे. तो जर सुजलाम सुफलाम झाला. तर देश प्रगती पथावर जाण्यास कोणीही रोखु शकणार नाही. हे भविष्यातील स्वप्न ही तुकडोजी महाराज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. युवाच भविष्यात भारत विकासात सर्वात महत्वाची भूमिका आहे, ही बाब सुद्धा तुकडोजी महाराजांच्या लक्षात आली होती. पण त्या अगोदर महिला सुशिक्षित होणं ही आवश्यक आहे कारण त्याच अशा युवकांना घडवू शकतील हे विचार सुद्धा तुकोडजी महाराजानी इंग्रज भारतावर राज्य करत होते तेव्हाच विचार केला होता. आणि यासाठी त्यांनी प्रयन्त ही केले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. वडिलांचे नाव बंडोजी तर आईचे नाव मंजुळा बाई. तुकडोजी महाराज यांचे खरे नाव माणिक बेंडोजी इंगळे. पण तुकडोजी हे नाव महाराजांना त्यांच्या गुरूंनी दिले. समाज प्रभोधनासाठी तुकडोजी महाराज ग्रामगीता हा...