पाहिले किंवा थोरले बाजीराव पेशवे म्हणून ओळखले जाणारे बाजीराव बल्लाळ हे चौथे छत्रपती म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शाहू महाराजांच्या कालावधीत बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर श्रीमंत पेशवे पदावर आरूढ झाले.
बाजीराव पेशवा हे बाळाजी विश्वनाथ यांचे सुपुत्र, बाजीराव यांनी वडिलांच्या सानिध्यात अनेक युद्ध कोशल्याच्या बाबी शिकल्या. मुघलसाम्राज्य जेव्हा कमकुवत झाले. त्यावेळी बाळाजी विश्वनाथ हे अनेक वेळा उत्तरे कडे सत्ता स्थापन करण्यासाठी मोहीम हाती घेत. त्यामुळे कोवळ्या वयात हट्ट करून बाजीराव हे सुध्दा उत्तरेकडे मोहिमेत शामिल होत. उत्तरे कडील दिल्ली, आग्रा या प्रदेशातील मारा करण्यासाठी मोक्याच्या ठिकाण बाजीरावणे बालपणीच पाहून ठेवले.
बाजीराव हे स्वभावाने तापत होते. शांत व मुत्सद्देगिरीपेक्षा तालावर बाजीराव यांना जवळची वाटायची.
त्यामुळे जेव्हा पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रीमंत पेशवा पद हे बाजीराव यांच्या कडे देण्यास छत्रपती शाहू महाराजांचे राजदरबारी मनाई करत होते. यांचे दोन करणे होती पाहिलं म्हणजे १. सत्तेचं नियंत्रण हे परंपरागत छत्रपतींच्या ताब्यात हवं हे देशवासीयांची इच्छा होणं स्वाभाविक होत. आणि दुसरं कारण म्हणजे २. बाजीरावाचा स्वभाव, एका घावात दोन तुकडे असेच विचार बाजीराव यांचे होते. त्यामुळे। अनेक राजदरबारी यांचा बाजीरावावर विश्वास बसत नव्हता.
पण पडत्या कालावधीत बाजीराव ने शाहू महाराजांची मदत केली होती. शेवटी शाहू महाराज यांनी लढाई व जोखमीच्या काळात बाजीराव सारख्या वीराला वयाच्या २० व्या वर्षी पेशवे पदावर नेमणूक केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा