मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महाभारतातील कर्ण संबंध ।



    अनेक  संकटे आली.उच्च समजणाऱ्या समाजाने अनेक बद्दतीचा त्रास ही दिला. एवढ काय शिकत असताना दलित आहे, म्हणून वर्गा बाहेर बसवून शिक्षण ही दिले ,पण तरीही हार न मानता शिक्षण घेण्याची व समाज हितासाठी काहीतरी करून दाखवण्याची जी तिव्र इच्छा असणारे महामानव बाबासाहेब आंबेडकर.

    महाभारतात अशाच दोन विराचे उद्धाहरण भेटते ते म्हणजे कर्णाचे आणि एकलव्याचे कर्णाला सूत पुत्र म्हणून अनेक वेळा युद्ध प्रशिक्षणा पासून दूर जावे लागले तर ऐकलव्यालाही कमी जातीचे उल्लेखून शिक्षणापासून दूर लोटण्यात आले.पण इतके संकटे येऊनही शेवटी महाभारताचा वीर योद्धा कर्णाला मानण्यात आले.

     अशीच काही गोष्ट बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर झाली असे इतिहासाकडे बघून लक्षात येते .बाबासाहेब आंबेडकरही ध्येय वादी होते ,समाजहितासाठी काही करून दाखवण्याची जिद्द बाबासाहेबा मध्ये दिसून येते .

    महामानव म्हटले जाणाऱ्या बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू येथील लष्करी छावणीत भिमाबाईंच्या पोटी जन्म झाला .आईचे नाव भीमाबाई असल्या मुळे बाबासाहेबाना भीमा असेही म्हणत. बाबासाहेबांचे वडील रामजी हे धार्मिक व प्रेमळ स्वभावाचे होते. बाबासाहेबानी खूप शिकावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. बाबासाहेबांचं उद्धिष्ट पूर्ण व्हावे अशी जर कोणाची इच्छा असेल तर ती म्हणजे त्यांची पत्नी रमाबाई . रमाबाईंनी जेव्हढे कष्ट सहन केले .असे कष्ट फक्त एक  पतिव्रताच घेऊ शकते बाबासाहेब जेव्हा विदेशात शिक्षण घेत होते त्यावेळी रमाबाईंनी अनेक कष्ट घेऊन बाबासाहेबांची आर्थिक मदत देत होत्या. 

       आज जी लोकशाही बगतोय ,सामान्य माणसासाठी जे कायदे बनवले आहे .त्या मध्ये बाबासाहेबांचा मोठा हात आहे. समाजासाठी व दलित समाजासाठी जे कार्य बाबासाहेबानी केले ते खरच वंदनीय आहे .

    अशा महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

दृष्टा विरुद्ध लढणाऱ्या दुर्गा मातेकडून घ्या हे पाच मौल्यवान गुण

            महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले.   त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे- १.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध          दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.   २.अशक्य गोष्टीस योजना_          महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला...

समर्थ रामदासस्वामीचे छत्रपती शिवरायांना व समाजाला मौल्यवान उपदेश

  यज्ञ तो देव जाणावा,   किंवा, वाळूचे कण रगडीता तेलही गळे,     असे संसारात न राहूनही समाजाला मौल्यवान उपदेश देणारे रामदास स्वामी, भक्ती ,धेर्य आणि हिम्मत या बळावर आपण कोणतेही लक्ष्य साध्य करू शकतो. समर्थ रामदासस्वामीनी जगप्रसिध्द ग्रंथ दासबोध मध्ये तर अनेक तात्विक विचारणा मांडले आहे. हे वरील काही उपदेशावरून लक्षातच आले असेलच.     जागी सर्व सुखी असा कोण आहे,     विचारी मना तूचि शोधूनि पाहे ,   त्यामुळे कर्तव्य महत्वाचे .जन्म का मिळाला? आपले मूळ कर्तव्य काय? तर समाजहित ,समाजासाठी कार्य ,कर्तव्य केले. तर ते ईश्वराला जाऊन मिळते असे अनेक उपदेश समर्थानी छत्रपती शिवरायांना सह छत्रपती संभाजी महाराजांना ही केले आहे.       समर्थांचा जन्म २४ मार्च १६०८ जालना जिल्यातील जांब या गावी झाला. वडिलांचे नाव सूर्याजी ठोसर तर आईचे नाव रेणुबाई, समर्थ लहानपणापासून खोडकर होते .पण एका निश्चित कालावधी नतंर त्यांच्यात बदल होऊ लागला .एकाच जागी निपचित राहून सम्पूर्ण जगाचा विचार करत, आई रेणुबाईना समर्थांचा हा स्वभाव लग्न झाल्यावर ताळ्यावर येईल, असे वाट...