तोरणा किल्यांनंतर शिवरायांना थांबणे घातक होते. मागरीच्या तलावात मोती काढण्यासाठी उतरल्यावर जसे चपळाई केल्यावर मोती हातात येतात, त्याच प्रणाने शिवरायांनी चपळाई दाखवण्यास सुरुवात केली.
मुळातच तोरणा जिंखल्यां नंतर ही विजापूरकर स्वस्थ झोपले होते ,याच गोष्टीचा शिवरायांनी फायदा घेण्याचे ठरवले. शिवरायांच्या खेपा रोहिडेश्वर, चाकण या क्षेत्रा मध्ये होऊ लागल्या ,त्याच वेळी त्यांचे लक्ष जवळच असलेल्या पुरंधर किल्यावर गेले. पुरंधर निजामाच्या हाती होता ,आणि किल्लेदार शहाजी महाराजांचे ,व दादोजींचा स्नेही निळकंठराव होते. त्यामुळे सुरुवातीला शिवरायांनी या किल्ल्याकडे फक्त नजर ठेवली .पण जेव्हा निळकंठराव यांच्या मृत्यू झाला, त्यावेळेस मात्र निळकंठराव यांच्या तीन मुलांमध्ये किल्याच्या महसुलीवरून वाद निर्माण झाला, आणि यातच नीलकंठराव यांच्या मोठा मुलगा निळोजी याने किल्यावर कबजा मिळवला. व लहाने दोन भाऊ संक्राजी व पिलाजी या दोघांनाही अधिकार देण्यास नकार दिला. शिवराय किल्यावर चाललेल्या या सर्व घडामोडी जाणत होते. निळोजी, संक्राजी व पिलाजी शिवरायांना मनापासून मानत होते. पण निळोजी आदिलशाहीची चाकरी सोडण्यास तयार नव्हता, तिघा भावमधील वाद आदिलशाहीची चाकरी , आणि संक्राजी व पिलाजी यांच्यावरील अन्याय . शिवरायांना पुरंधर न युद्ध करता वाटाघाटी करून स्वराज्यात आणण्यासाठी नामी संधी सारखा वाटला. शिवाय संक्राजी व पिलाजी दोघेही आपला स्वतःचा अधिकार किल्यावर मिळावा म्हणून शिवरायांना भेटत होते, शिवरायांकडे त्यांनी मागणी केली, की किल्यावर तिघंही भावांचा समान अधिकार असायला हवा . शिवरायांनी आश्वासन दिले की किल्ला सामना वाटप केला जाईल, पण त्यासाठी तुम्हा दोघांना स्वराज्यात यावे लागेल ,संक्राजी व पिलाजी यांनी शिवरायांना स्वराज्यात आल्याचे आश्वासन दिले .
आणि इकडे आपल्या बरोबर दोघे भाऊ दगा फटका करतील म्हणून निळोजी किल्ला उतरण्यास तयार नव्हता,आणि जोपर्यंत किल्ल्यावर स्वतःहून निळोजी बोलावत नाही तो पर्यंत शिवराय किल्यावर जाऊ शकत नव्हते
शेवटी यावर उपाय म्हणून संक्राजी व पिलाजी यांनी दिवाळीच्या दरम्यान निळोजी ला सांगून शिवरायांना किल्यावर येण्यासाठी निमंत्रण पाठवले
क्रमशः.....
पुढील भागात शिवारायांनी किल्ला कपाटाने घेतला की गनिमी काव्याने ते पाहू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा