यज्ञ तो देव जाणावा,
किंवा,
वाळूचे कण रगडीता तेलही गळे,
असे संसारात न राहूनही समाजाला मौल्यवान उपदेश देणारे रामदास स्वामी, भक्ती ,धेर्य आणि हिम्मत या बळावर आपण कोणतेही लक्ष्य साध्य करू शकतो. समर्थ रामदासस्वामीनी जगप्रसिध्द ग्रंथ दासबोध मध्ये तर अनेक तात्विक विचारणा मांडले आहे. हे वरील काही उपदेशावरून लक्षातच आले असेलच.
जागी सर्व सुखी असा कोण आहे,
विचारी मना तूचि शोधूनि पाहे ,
त्यामुळे कर्तव्य महत्वाचे .जन्म का मिळाला? आपले मूळ कर्तव्य काय? तर समाजहित ,समाजासाठी कार्य ,कर्तव्य केले. तर ते ईश्वराला जाऊन मिळते असे अनेक उपदेश समर्थानी छत्रपती शिवरायांना सह छत्रपती संभाजी महाराजांना ही केले आहे.
समर्थांचा जन्म २४ मार्च १६०८ जालना जिल्यातील जांब या गावी झाला. वडिलांचे नाव सूर्याजी ठोसर तर आईचे नाव रेणुबाई, समर्थ लहानपणापासून खोडकर होते .पण एका निश्चित कालावधी नतंर त्यांच्यात बदल होऊ लागला .एकाच जागी निपचित राहून सम्पूर्ण जगाचा विचार करत, आई रेणुबाईना समर्थांचा हा स्वभाव लग्न झाल्यावर ताळ्यावर येईल, असे वाटून लग्न लावले .पण पंडित जेव्हा सावधान म्हणाले त्यावेळी समर्थानी जी धूम ठोकली तेथून ते नाशिकला आले.१४ कोटी रामनामाचा जप केल्यावर समर्थानी देशाटन केले.
समर्थांची आणि शिवरायांची भेट झाली, तेव्हा शिवरायांच्या कार्याने समर्थ खुप आनंदीत होते.हिंदू धर्म टिकून रहावा ,यासाठी समर्थानी महाराष्ट्रात ठीक ठिकाणी हनुमानाचे मंदिरे बांधली. शिवरायांचा देहान्त झाल्यानंतर संभाजी राजे जेव्हा छत्रपती झाले, त्यावेळेस एक बोधक पत्र समर्थानी संभाजी महाराजांना लिहिले होते. जे आजही वाचण्या सारखे आहे.
रामाचा जन्म रामनवमी म्हणजे आजच्याच दिवशी झाला. आणि रामदासांचा जन्मही यांचा दिवशी झाला, त्यामुळे संपूर्ण आयुष्य समर्थानी राम चरणी वाहून दिले. समर्थांनी लिहिलेले मनाचे श्लोक जर स्मरण केले तर आयुष्याच्या अनेक कठीण वळणावर त्या श्लोकांचा उपयोग होऊ शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा