भारतावर अनेक मुघल शासकांनी राज्य केले,पण त्यांनी राज्य केले म्हणजे सेना व शक्ती जास्त होती, असे मुळातच नाही. ज्यावेळी मराठ्यांनी अटके पार झेंडे फडकवले.त्या मध्ये त्यांनी कमी सैनिकांचा वापर करून युद्ध केले होते.पण जेव्हा मुघल व पाश्चिमात्य अफगाणिस्तान इराण इराक या देशातील म्लेंच्छणी भारतावर अनेक वेळा आक्रमण केले होते. त्यामध्ये भारतीय राजा पुढे ते अनेक वेळा टिकू शकत नव्हते. भारतीय सैनिक निष्ठेने लढत आणि खाल्या मिठाला ती एकनिष्ठ राहत. तर मुघलांची सेना शरीराने धिप्पाड जरी असली तरीही युद्ध प्रसंगी ती कठीण परिस्थितीचा सामना करू शकत नव्हती. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत टिकून राहणाऱ्या हिंदू राजा पुढे मुघल अनेक वेळा टिकाव धरू शकत नव्हते.यामुळे शेवटी मुघलांनी कपट युद्धाला सुरुवात केली.मुघलांच्या लक्षात आले की ,भारतीय हिंदू सैनिकांची व राज्यांची खरी आस्था ही हिंदू मंदीरावर आहे .शिवाय हिंदू देवावर त्यांचा स्वतःच्या जीवा पेक्षा जास्त विश्वास आहे .आणि त्याच बरोबर हिंदू सर्वात जास्त दान धर्म सुद्धा मंदिरातच करतात. मुघलांनी भारतावर सत्ता मिळवण्यासाठी हिंदू संस्कृती वर ही आगाध करण्याचा प्रयन्त केला. ज्या मुळे हिंदू सैनिकांचा स्वता वरील विश्वास कमी होऊ लागला. शिवाय भारतीय राजा मध्ये ही एकता नव्हती .अनेक वेळी हिंदू राजमध्ये आप आपसातील युद्धा मुळे नेमके आपले विरोधक कोण याचा भारतीय सैनिकामध्ये गोंधळ निर्माण झाला. शिवाय हिंदू राजांनी केव्हा ही इतर भूभागकडे वाईट नजरेने पाहीले नव्हते. आणि सैनिकांनी ही स्वतःहून आक्रमण करून युद्ध केले नव्हते. भारतात अनेक जाती धर्म पंथ होते .त्या सर्वामध्ये मुघलांनी फूट पडण्याचा प्रयत्न केला गेला .
त्यामुळे मुघलांनी सर्वात प्रथम हिंदू राजा व सैनिकामधील विश्वास मोडण्यासाठी हिंदू मंदीरे पडली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा