भारतात रामायण घडून गेले ,ही काही सामान्य बाब नव्हे,किंवा रामयनाकडे फक्त एक सामान्य धार्मिक, व सांस्कृतिक ग्रंथ म्हणून बघण्या पेक्षा जीवन सांगण्याचा जो मूळ मंत्र श्री यांनी सांगितले आहे ,त्याचे पालन करून आपण स्वतः आपले जीवन समृद्ध करू शकतो .
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम
श्री राम कोणतेही कार्य करताना ते कार्य एका मर्यादेत राहून करत. त्या कार्याचा अतिरेक किंवा अधिक मिळवण्याची हवस श्री रामात नव्हती. त्यामुळेच श्री रामाला मर्यादा पुरुषोत्तम श्री राम म्हटले जाते.
आपणही आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींची अपेक्षा तेवढीच बाळगा जी आपल्या मर्यादेत आहे.तिची अधिक अपेक्षा बाळगली तर त्या गोष्टीची माती होण्यास जास्त वेळ लागत नाही.
संयम
संयमी म्हणजे ज्या मध्ये उतावळे स्वभाव म्हणजे कुठलीही गोष्ट ताबडतोब मिळावी ही अपेक्षा नाही असा , श्री राम संयमी होते,कुठलेही कार्य ते संयमी राहून करत. तापत स्वभाव लक्ष्मणाला होता पण राम सतत लक्ष्मणाला संयम बागळण्यास सांगत .
आदर
संपूर्ण रामायणात श्री राम हे मोठ्या व्यक्तीचा आधार ठेवताना दिसतात. मग ते माता पिता असोत किंवा गुरुजन श्री राम सर्वांचे दर्शन घेऊन त्यांचा आदर करत.
आवश्यकता आजच्या कालावधीत युवकांमध्ये अधिक गरजेची आहे फक्त राम भक्त किंवा शिवभक्त म्हणून काही होत नाही छत्रपती शिवराया सारखे मोठ्यांचा आदर ठेवणे गरजेचे आहे.
नेतृण
नेतृण हा मौल्यवान गुण जर बघितला तर श्री राम यांच्यात प्रखरते दिसतो .श्री राम जेव्हा वनवासात गेल्यावर रावणाने सीता मातेचे हरण केले ,त्या वेळेस श्री राम यांनी फक्त वक्तृत्व आणि नेतृव या क्षमते च्या बळावर अयोद्धेतून कोणतीही मदत न मागता एक भव्य वानरसेना उभी केली.
युद्ध योजना
रावांची सेना मायावी होती, तर श्री राम घेऊन गेलेली वानरसेना एक सामान्य मानवी क्षमता असलेली सेना होती .पण श्री राम यांच्या नेतृत्वाखाली व युद्ध नियोजन यामुळे श्री राम विजयी झाले
आपणही राबवलेल्या योजना विवेकी व नियोजित हच्या जेणेकरून विरोधक कितीही क्षमता वाण असला तरीही विजय आपलाच व्हायला हवा.
या सारखे अनेक गुण आपण राम चरित्रातून शिकू शकतो त्यामुळे प्रत्येक घरात राम चरित्र वाचन पठण व्हायलाच हवे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा