भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे तिर्थकर. ज्यांचा जन्म इ.स.पू ५९९ ते ५२६ या दरम्यान उत्तरेकडील कुंडलपूर येथे इस्वाकू वंशात झाला.वडील सिद्धार्थ जे एक क्षत्रिय राजा होते, तर आईचे नाव त्रिशला होते.
महावीर हे खरे अविवाहित राहणार होते. पण माता पितांच्या आग्रहामुळे महावीर वर्धमांन यांचे लग्न यशोदा नामक राजकन्ये बरोबर झाला. महावीर यांना प्रियदर्शिनी नावाची मुलगी होती.
महावीर यांनी १२ वर्ष तप करून अनेक विकारावर विजय मिळवला होता.
भगवान महावीर यांनी समाजाला अनेक बोधक संदेश दिले ज्या मध्ये त्यांचे पंचतत्व सर्वत्र प्रसिद्ध आहे ते पुढील प्रमाणे -
सत्य
सर्वांशी खर बोलावं खोट बोलणे हे एक पाप आहे ,असे भगवान महावीर यांचे मनाने आहे.
अहिंसा
कुठल्याही प्राण्यांची किंवा जीवाची हिंसा न होता ,सर्वा बरोबर अहिंसेने राहावे असा संदेश महावीरांचा आहे.
अस्तेय
म्हणजेच आपला अधिकार नसता दुसऱ्याची कुठल्याही वस्तूची चोरी करणं एक प्रकारे पापच आहे ,हे महावीर यांचे तिसरे तत्व आहे.
अपरिग्रह
हे सर्व जग नाशवंत आहे त्यामुळे कुठल्याही वस्तूचा संग्रह किंवा साठा करून काहीही उपयोग नाही हे त्यांचे ४ थे तत्व आहे.
ब्रम्हचर्य
प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी काही कालावधी साठी ब्रम्हचर्य चे पालन करावे हे त्यांचे पाचवे तत्व आहे.
महावीर यांचे जीवन हे शांत आणि भक्ती मार्गचे होते.
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त त्यांना आपल्या सर्वांकडून विनम्र अभिवादन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा