२६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.
छत्रपती शिवरायांनी आपल्या सरदारांना आणि मावळ्यांना मातृभूमी विषयी एवढं जागृत केलं होतं की दुष्मन कितीही मोठा असोत पण त्याचा सामना करायचाच. त्यामुळेच बाजी पासळकरांनी दोन मोठे विरोधक सुभानमंगळ गडावर असूनही त्यांचा सामना केला. शिवरायांना गड ताब्यात आल्याची वर्दी बाजीनी दिली. गड फत्ते झाल्याचे समजतात. शिवरायांना खुप आनंद झाला. पण जेव्हा ही बातमी आधीलशाहाने पाठवलेल्या फत्तेखानाला समजली तो चवताळून उठला. त्याने सरळ चाकण वर चढाई करायचे ठरवले. इकडे बाजी पासळकरांनी सुभानमंगळ गडातून मोठी लूट मिळविली. घोडे आणि दारुगोळा मोठया प्रमाणात मिळाल्यावर ती सर्व कुमक घेऊन शिवरायांनी बाजींना चाकण ला बोलावले. आदिलशाहीचा दारुगोळा अदिलशाही वर वापरायचा असे शिवरायांनी ठरवले. फक्त मोठ्या फौजेच्या भरोश्यावर आलेला फत्तेखान शिवरायांच्या योजनेला समजू शकला नाही त्याने सरळ किल्यावर हल्ला चढवला. शिवरायांनी सर्वात आधी खानाला तोफांच्या गोळ्यांच्या सीमेत आणले, व त्यानंतर बेसावध खानावर गोळे डागण्यास सुरुवात केली. तोफेच्या गोळ्...