छत्रपती शिवरायांनी ज्या वेळी रारारेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, त्यावेळी मुघलांचे अत्याचार पाहून मावळ्यांच्या मनात राग उफळत होता. परकीय निजाम केव्हाही काहीही आदेश देतील आणि आपली गाव लुटली जातील ,आया बायांच्या अब्रू लुटल्या जातील, हे मावळे शतकानुशतके बघतच होते. त्यात आपले काही हिंदू राजे जहागिरी साठी केव्हाही आपला मान या निजामान पुढे झुकवत. ज्याचा राग सामान्य जनतेत आणि मावळ्यांच्या मनात होताच, फक्त त्याला आग लागने गरजेचे होते. जे शिवरायांनी केले, देशभक्ती मातृभूमी प्रेम जागृत करून.
दोदोजीं कोंडदेव ही शहाजी राज्या सह निजामाची गुलामगिरी करण्यास राग येत होता, शहाजीराज्यानी निजामविरुद्ध बंड पुकारला, त्यात दादोजींची मदत होती. पण ज्यावेळी बंड मोडून काढला, त्यावेळी दादोजींचे मन हिरमुसले होते. ज्यावेळी शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. सुरुवातीला शहाजीराजेना आलेले अपयश शिवरायांना ही येते की काय? असे दादोजींना वाटायचे, पण जेव्हा शिवरायांचा स्वराज्या प्रति उत्साह ,आणि जोश पाहिल्यावर त्यांचीही खात्री पटली होती.
ज्या कालावधीत दादोजीं सह मावळे आणि शिवराय यांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतल्या त्या नंतर मावळे शिवरायांना म्हणाले होते की " जगायचं तर वाघ होऊन जगायचं ,शेळी होऊन या परकीयांची गुलामगिरी आता करू वाटत नाही ,राजे आता फक्त आदेश करा".
मित्रानो आज छत्रपती शिवरायांनी उभे केलेलं स्वराज आणि इतिहास जग प्रसिद्ध आहे. शेळीच जीवन जगण्या पेक्षा त्यांनी वाघाच जीवन निवडलं. महत्व आता आपल्याला आहे की आपन कसे जीवन निवडतो !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा