छत्रपती संभाजी महाराज सत्तेवर होते, त्याच कालावधीत औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला. तब्बल नऊ ते दहा वर्षे मुघलांना अडवल्या नंतर फंद फितुरीला ते बळी पडले, व मुघलांच्या कैदेत गेले. शंभूराज्यांचे पुत्र शाहू महाराज लहान असल्या मुळे शंभू राज्यांच्या पत्नी येशुबाई यांनी काही दिवस करोभार बघितला ,पण रायगडाचा किल्लेदार खंडोजी पिसाळ मुघलांना जाऊन भेटला, त्यामुळे शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई मुघलांच्या ताब्यात गेले.यानंतर गादीवर आले ते शिवरायांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज भरपूर दिवस मुघलांचा सामना केल्यानंतर ते ही वीर गतीला प्राप्त झाले.
शेवटी गादीवर आल्या त्या ताराबाई, भरपूर दिवस मुघलांना आडवणाऱ्या त्या महाराणी बनल्या. वृद्ध झालेला औरंगजेब शेवटी महाराष्ट्रातच त्याने आपली कबर खोदली . औरंगजेबांनंतर बादशहा कोण होणार यासाठी मुघलांमध्ये आप आपसात युद्ध होऊ लागले. याच दरम्यान शाहू महाराज व येसूबाई यांना मुक्त करण्यात आले. हक्काने वारसदार शाहू महाराज होते. पण ताराबाई स्वतः निर्माण केलेल राज्य शाहू महाराजांना देण्यास नकार दिला . शेवटी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात तुंबळ युद्ध झाले. स्वराज्यातील अनेक निष्ठावंतांनी शाहू महाराजांना सहकार्य केले, ज्या मध्ये शाहू महाराजांचा विजय झाला.
पण जेव्हा शाहू महाराज सत्तेवर बसले, त्यावेळी त्यांच्याकडे कोठल्याही प्रकारचे राज्य चालवण्याचे ज्ञान नव्हते. शेवटी सहकाऱ्यांनी शाहू महाराजांना उपदेश केला की, तुम्ही फक्त राज्याचे महाराज व्हा व निर्णय घेण्याचा अधिकार पंत प्रतिनिधींकडे द्या. शाहू महाराजांनी या निर्णयास मान्यता दिली .ज्या मध्ये श्रीमत पेशवा या पदास मोठी शक्ती प्राप्त झाली .
शाहू महाराजानी पहिले पेशवा बालाजी विश्वनाथ भट्ट यांना निवडले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा