छत्रपती शिवरायांच्या शूर वीरांच्या तिजोरीत अनेक कल्पक ,धीर जिद्दी सरदार होते जे छत्रपती कडून एखादी कामगिरी मिळाल्यावर उसंत घेत नव्हते .
छत्रपतींचा राज्याभिषेक काही दिवसांवर येऊन ठेपला होता. आणि त्याच मुळे आदिलशाही आणि मुघलशाही एकत्र येणे लाजमी आणि शिवरायांचा प्रताप दाखवण्यास पुरेसे आहे. त्याच मुळे निजामाने बहलोलखानास १२ हजाराच्या फौजेसह छत्रपतीवर चालून जाण्यास सांगितले .ही खबर जेव्हा शिवरायांना कळली .तेव्हा त्यांनी ताबडतोब सरनोबत प्रतापरावांची भेट घेतली. खान उंबरणीत आपला तळ ठोकून बसला होता. आणि मुघलांकडून येणाऱ्या फौजेची वाट पाहत बसला होता. शिवरायांना ही नामी संधी वाटली .आणि प्रतापरावाणी शिवरायांच्या मनातील ही गोष्ट हेरली.
दुष्मन खाऊ द्यायच बलाढ्य होऊ द्यायच इतका वेळ दिल्यावर अंगावर घ्यायचं हे शिवरायांचे तत्व मुताळतच नव्हते .अंगावर येणारच आहे ,तर त्या आधीच दुष्मन ठेचायचा म्हणजे समोरच्याला पुढील हमला करता धाक पडायला हवा .
छत्रपती शिवरायांचा आदेश मिळताच प्रतापरावयांनी खान जेथे तळ ठोकून बसला होता .त्या पूर्ण प्रदेशालाच रात्रीचे मराठ्यांनी वेढा घातला. खान विचार करूनच उंबरणीत थांबला होता ,कारण उंबरणी पासून मुघल जवळ होते ,शिवाय निजामाची कुमक हळूहळू येतच होती. शिवाय हा परिसर हिरवळ होता ,जागा बघून खानाने नदी जवळच आपला तळ टाकला होता .हीच गोष्ट प्रतापरावाणी हेरली काही सैनिक नदी पात्रा लगत घात देऊन बसले. सकाळी जेव्हा खानाचे माणसे उठली तेव्हा रानडुकराला चारही बाजूने वाघाने गेरल्यावर जसा मृत्यू समोर दिसतो तसा मृत्यू खानास दिसू लागला .
प्रतापराव या ठिकाणी गनिमी कावा कशाला सोडणार खानाला चारही बाजूने घेतल्यावर प्रतापराव घिधडा सारखे खानाचे लचके घेत होते .
खानाला प्रतापरावांचा स्वभाव महित होता. केविलवाने शाब्दिक पत्र लिहून आपल्या वकीलासह त्याने प्रतापराव यांकडे पाठवले." आम्हाला क्षमा करावी आपण थोर आदिल शाईच्या मर्जीने आम्ही येथवर आलो यात आमचा काही दोष नाही आम्हाला जाऊ द्यावे".
भावनिक असणारे प्रतपरावांचे मन पत्र वाचून विरघळते आणि त्यांनी बहलोल खानास सोडून दिले.
या पुढील भागात छत्रपती शिवराय बहलोल खानास सोडल्यामुळे प्रतापरावावर का रागावले याविषयी क्रमशः.....
good
उत्तर द्याहटवा🙏
उत्तर द्याहटवा