शक्ती पेक्षा बुद्धी श्रेष्ठ छत्रपती शिवरायांचे सुरुवाती पासूनचे तत्व आणि सुरुवातीच्या संकटांचा सामना
प्रत्येक युद्धा मध्ये शक्तिचा वापर करावा लागतो ,हा आपला समज आहे किंवा प्रत्यकाचे तत्व आहे. छत्रपती संभाजी महाराजानी अनेक युद्धा मध्ये तुल्यत्मक रित्या शक्तीचा जास्त वापर केला आहे, हे शंभु राजांचे तत्व असू शकते.पण जर शिवरायांचा विचार केला .तर त्यांनी अनेक युद्धात तुल्यत्मक रित्या बुद्धीचा वापर केलेला दिसतो .
आर्य चाणक्यनी ही त्यांच्या ग्रंथामध्ये शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ चे तत्व स्वीकारले आहे .आर्य चाणक्य यांनी अनेक युद्धात कुटणीती व युक्ती वापरून नियोजना च्या बळावला युद्ध लढले आहे.
श्री राम ही शांत विचार सारणीचे होते रावण व इतर राक्षसांशी युद्ध करताना श्री राम यांनी संयम व नियोजन बद्ध हे तत्व स्वीकारले असेल असे आढळून येते.
जिजामतेचे रामायण ऐकणारे छत्रपती शिवाजी महाराज श्री रामाच्या संयम व शांत तत्वाला सोडणार कसे !
तोरणा जिंखल्या नंतर शिवरायांकडे थांबणे घातक होते .कारण शिवरायांनी निजामविरुद्ध एक प्रकारे बंड पुकारला होता.या मुळे शिवरायांनी संयमित रित्या शेजारील किल्लेदाराशी काहीशी वाटाघाटी करून तर काहींना आर्थिक लालूच दाखवून तर काहींशी कुटणीती खेळून अनेक किल्यानां स्वतःच्या बाजूने केले .
त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात सुरुवातीला आर्थिक अडचणी येतात, किंवा अनेक अडचणी येतात ज्या शिवरयांच्याही आयुष्यात आल्या पन त्या संकतावरही त्यांनी मार्ग शोधला त्यावर त्यांनी मात करण्याचा प्रयत्न केला .आणि आपला यशाचा मार्ग मोकळा केला .
त्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक संकटे असतील आणि आपल्याला आपले स्वप्न आपले ध्येय पूर्ण करायचे असेल तर नक्कीच शिवरायांचे चरित्र आठवावे म्हणजेच आपले संकट त्यांच्या संकटा पुढे इवलेसे दिसेल आणि त्यांनी वापरल्या योजना आपल्याला कमी येतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा