जय हनुमान ज्ञान गुण सागर ।
जय कपीस तिहु लोक उजागर।
संत तुलसी दास यांनी लिहलेला हा बजरंगाचा चालिसा सर्वश्रुत प्रसिध्द आहे. ४० कडवे असल्यामुळे चालिसा हे नाव प्रसिद्ध झाले.
नाशिक जिल्यातील अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी हनुमंताचा जन्म झाला. वडील केसरी जे वानरांचे महाराज होते.
बालपणात सूर्याला जेव्हा फळ म्हणून खाण्यास उड्डाण केलेल्या वायुसुता ला इंद्राने बघितल्यावर वज्रचा मारा केला, ज्यामध्ये हनुमानाच्या हनुवटीला मार लागला, वायू देवला याचा खूप राग आला. तो राग शांत करण्यासाठी अनेक देवांनी हनुमंताला शक्ती प्रदान केली, कुबेराने गदा दिली, तर इंद्राने हनुवटीला मारा लागल्या मुळे हनुमान हे नाव प्रदान केले.
बलशाली हनुमंत
शक्ती आणि सामर्थ्य या दोन्हीचा जेथे संगम आढळतो, असे हनुमंतराया. कुस्ती खेळणारे पहिलवान डाव खेळताना पहिल्यांदा हनुमंताचे स्मरण करतात.
बुद्धिवंत मारुतीराय
सूर्याच्या प्रतिक्रम चालू असताना हनुमंताने सूर्याकडून ज्ञान घेतले. हनुमंत ज्ञान घेण्यासती सतत तत्पर असत. हनुमंत बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते.
भक्तीची मूर्तिमंत देवता बजरंगबली
भगवान श्री रामाचे लाडके भक्त बजरंगबली यांनाच ओळखलं जातं. भक्ती हा योग, कर्म,ज्ञान या मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे.श्री रामाची जो भक्ती करतो त्याचे मारुती राया रक्षण करतात.
किर्तीवाण मारुतीराया
बजरंगबलीची कीर्ती सर्व जगात प्रसिद्ध आहे, हनुमंताची भक्ती केल्यावर व विवेकी कर्म केल्यावर आपली ही कीर्ती सर्वदूर पसरते.
चाणाक्ष आणि चतुर मारुतीराय
मनोजव्यं मारूती तुल्य वेगं,
जितेंद्रीयं बुद्धी मत्ता वरिष्ठं
मारुतीराय किती चतुर आणि चपळ होते, हे समर्थ रामदास ह्यांच्या श्लोकातून लक्षात येते. मनाच्या गतीपेक्षा मारुतीरायची गती जास्त होती. आणि चतुर एवढे की शनी अजून ही मारुती रायावर लागला नाहीये.
मारुती रायची भक्ती फक्त संकट निवारण्यासाठी करण्या पेक्षा मारुती रायची भक्ती सह त्यांचे गुण घेतले तर आजच्याही कालावधीत यशस्वी होण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
जय बजरंग बली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा