प्रतापराव यांनी बहलोलखानास सोडल्यामुळे शिवरायांचे जे खरखरीत पत्र रावांनी वाचले त्यामुळे त्यांचे मन दुःखी झाले .
शिवरायांनी कल्पना केल्या प्रमाणे खानाने जखमी सर्पप्रमाणे पुन्हा ताकद जुटाऊन स्वराज्यकडे वाटचाल सुरू केली, प्रतापराव यांना खान चालून येत असल्याची वार्ता कळली तेव्हा त्यांना पाश्चाताप ही झाला ,आणि रागही आला .
खान चालून येताना आता मोठी फौज घेऊन येत होता, तो पूर्ण चौताळलेला होता. स्वराज्यातील सर्व गाव तो उध्वस्त करत चालला होता ,मोठी फौज असल्यामुळे ताबडतोब खानाला थांबावं आता प्रतापरावांना अशक्य होतं ,कारण पहिल्या युद्धात अर्धी सेना दमलेली होती, व नव्या व ताज्या दमाची फौज येण्यास किमान १५ एक दिवस लागणार होते ,प्रतापरावांच्या सहकाऱ्यांनी अत्ता थोडा धीर धरण्यास सांगितलं, पण शिवरायांचे खरखरीत पत्र व बहलोलखानाचा उर्मट पना रावा ना पाहवेना .
खान आला त्यावेळी शेजारच्या जंगलामध्ये राव शिकार करत होते, गुप्तचरणी जेव्हा ही खबर राव याना दिली तेव्हा प्रतापरावांचे रक्त खानाला पाहून सळसळू लागले पुढचा कोणताही विचार न करता समशेर घेऊन त्यांनी घोड्यावर टाच मारली, रावांच्या सहकाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा खुप प्रयत्न केला ,पण रावमध्ये जशी रणचण्डिकाच अवतरली होती .
प्रतापराव मोठ्या तेजीत घोडयावर बसून समोरून येणाऱ्या खाण्याच्या फौजेत घुसले, रावांचे जे इतर साथीदार होते ,धनी मृत्यूच्या घरात गेल्यावर ते थांबणार कसे राव आणि रावांचे सहा साथीदार असे एकूण सात जण त्या मृत्यूच्या दरबारात घुसले अमर होण्यासाठी.
काही अंतरावर असलेल्या रावांच्या फौजेला ही बातमी समजली त्यांनी तंबोडतोब शिवरायांना पत्र पाठवले शिवरायांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांना खुप वाईट वाटले.शिवराय विचार करू लागले की ,आम्ही तरी प्रताप रावांचा तापट स्वभाव समजून घ्यायला हवा होता.
या नंतर या घटनेला शिवराय वेडात वीर दौडले सात असे संभोधले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा