महात्मा जोतीराव फुले जेव्हा तरुण अवस्थेत होते . त्या वेळीच त्यांनी अनेक समाजसुधारणा केल्या होत्या, त्यांचे असे म्हणणे होते की ,जीवनात विद्या आणि नीती असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो, फक्त त्यासाठी प्रथम जीवनात नीती मूल्यांचा म्हणजेच कुठलेही कार्य करताना नियम, योजना, ज्ञान असणे आवश्यक आहे.
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
हे जोतीराव फुलेंचे प्रेरक काही कवितेच्या पंक्ती जोतीरावांचे म्हणणे होते की ,वेद हा मानवनिर्मित आहे ,आणि त्यातील जाती व्यवस्था ही पूर्णपणे मानव निर्मिती आहे ,त्यांनी अनेक वेळा जाती व्यवस्थेचा कडाडून विरोध केला. या साठी त्यांनी त्यावेळच्या उचवर्गीय समाज म्हणजे ब्राह्मणाच्या विरोधात जाऊन दलित अस्पृश्य समाजाला शिक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. स्वात प्रयत्न करून समाजाच्या विरोधाचा ही सामना केला .
महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म 11 एप्रिल 1627 रोजी कटगुण सातारा जिल्यात झाला .गोविंदराव फुले हे त्यांच्या वडिलांचे नाव, तर चिमनाबाई हे त्यांच्या आईचे नाव, जोतीराव यांचे मूळ आडनाव गोरे होते .पण वडील आणि त्यांचे चुलते फुले विकत त्यामुळे त्यांचे आडनाव फुले असे झाले .जोतीराव शाळेत हुशार आणि चपळ होते .वाचण्याचा त्यांना खुप छंद होता. जोतिराव यांच्यावर शिवरायांचा प्रभाव होता .त्यांनी त्यांच्या अनेक ग्रंथा मध्ये शिवरायांचे विचार प्रगत केले आहे.
वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्री बाई यांच्याही झाला .शिक्षणाची पराकोटीची आवड असणाऱ्या सावित्री बाईंना स्वतः जोतिरावांनी शिक्षण दिले .
समाजात स्त्री शिक्षण किती महत्वाचे आहे हे जोतीरावांना अडाणी राहिल्या मुळे स्त्रीयावर किती अत्याचार होतात यावरून लक्षात आले .पत्नी बरोबर संसार करायचा सोडून स्त्रियांसाठी समाज्याच्या विरोधात जाऊन शाळा उघडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. आणि मुली साठी जी पहिली शाळा उघली तेथील पाहल्या महिला शिक्षिका होत्या सावित्री बाई. या नंतर शाळा बंद पाडण्यासाठी जो त्रास दिला तो सर्वाना माहीतच आहे.
महात्मा जोतीराव परखड विचारांचे होते. समाज समान आहे ,कोणीही उच्च नाही कोणीही नीच नाही ,देवाने सर्वाना समान निर्माण केले आहे .सर्वांनी एकत्रित गुण्यागोविंदाणे राहावे अशी इच्छा जोतीरावांची होती .
अशा थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांना त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी वंदन।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा