छत्रपती शिवरायांच्या कालावधीतील इतिहास जर पहिला तर शिवरायांचे अनेक साथीदार, मावळे,सरदार शिवरायांसाठी जीव की प्राण देण्यास तयार होते. खरे पाहिले तर मराठे खाल्या मिठाला जगात, आणि एकदा वचन दिले तर ते तोडणे म्हणजे मराठ्यांना मृत्यू समान वाटत. शिवाय जुने व काही चुकीच्या धार्मिक परंपरेत अडकलेल्या आपल्या हिंदूंवर पौराणिक कालावधीतील अनेक गोष्टींचा प्रभाव होता.भावनांच्या भरात अनेक वेळा शक्तीचा वापर अधिक होत होता. त्यामुळे कलियुगातील अनेक राजपटवरील डाव मराठे भावनांच्या बळावरच लढत .ज्याच्या मध्ये भावना बलवत्तर आहे ,तो विचारांचा वापर करत नाही हे अनेक इतिहासातील उदाहरणावरून लक्षात येते.
राकट स्वभावाचे लक्ष्मण हे श्री रामाच्या भक्तीती मध्ये राहत ,त्यामुळे अनेक वेळा युद्धच्या वेळी ते भावांच्या भारत युद्ध करत.
(रावणाचा पुत्र इंद्रजित मायावी होता, हे रामाने समजून सांगितले होते ,तरीही श्री रामाला लालकरल्यामुळे भावनांच्या भरात लक्ष्मण इंद्रजित बरोबर युद्धास गेले, नंतर मायावी शक्तीचा वापर करून लक्ष्मणाला मूर्च्छित होण्याच्या स्तिथी पर्यंत जावे लागले नंतर हनुमान आणि संजीवन बुटी हा कथा भाग तर आपण जाणतातच.)
महाभारतातही भीम भावनेच्या भरात युद्ध करत पण श्री कृष्ण अनेक वेळा भीमाच्या मदतीला धावून येत .
मिर्झाराजे ही औरंगजेबाच्या याच कचाट्यात अडकलेले होते.
छत्रपती शिवरायांना ही हिंदू मधील ही चूक लक्षात आली. धार्मिक व भावनिक गोष्टीवर विश्वास एखादया मर्यादे पर्यंत हवा ,पण तो अति जास्त नसावा की भावनवच्या आवेशात आपले मूळ कर्तव्यच विसरून जावे लागेल, असे शिवरायांचे मत होते .
प्रतापराव गुजर हे छत्रपतींचे सर्वात विश्वासु मधील एक ,शिवरायांसाठी मृत्यूलाही सामोरे जाणारे, पण भावनेच्या भरात स्वतःचे मूळ कर्तव्य मात्र ते विसरून जात .
छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी सरसेनापती प्रतापराव यांना बहलोलखानास पकडण्यास पाठवले त्यावेळी प्रतापराव शिवरायांसाठी युद्ध तर जिंखले, पण बहलोलखानाने विनंती केल्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन खानाला माफ करून सोडून दिले .
पुढील भागात प्रतापराव व बहलोलखान यांच्यातली युद्धाचा थोडक्यात मागोवा घेऊ .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा