शिवराया प्रमाणे शंभू राजे ही बाळपणापासूनच शूर होते. शिवरायांनी ज्या वाघिणी कडून बालपणी रामायण महाभारताचे धडे घेतले तोच वारसा शंभू राजांनाही लाभला होता.
शंभू राजे बालपणापासून तल्लख बुद्दीचे होते .त्यांना कोणतीही गोष्ट एकदा सांगितल्यावर ती त्यांच्या स्मरणात राहत त्यामुळेच ते संस्कृत ,उर्दू ,तमिळ याच बरोबर त्यांना क्षेत्रीय ५ पेक्षा अधिक भाषा येत शंभाजी राज्यांना इंग्रजी भाषेचे सुद्धा ज्ञान होते. या वरून हे लक्षात येते की संभाजी राजे चालू कालावधीत कोणती गोष्ट संकट होऊ शकते याची चाहूल त्यांना लवकर लक्षात येते असे .
सावत्र आई सोयरा बाई अनेक वेळा संभाजी राज्याचे बाल्य मनात काही मतभेदाच्या वाईट गोष्टी सांगत होत्या. असे अनेक इतिहासातील घटकामध्ये आढळून येते. त्यात शंभू राज्यांचे मन लहान पणापासूनच हळवे होते. शंभू राज्यांचे बालपणापासूनचे वैरी ज्यांना संभाजी राजे शिवराया नंतर छत्रपती होऊ नये असे वाटत होते,त्यांनी सतत संभाजी राज्यांचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. पण वाघिणीचे प्रशिक्षण घेणारा याला भाळणार तो कसा.
संभाजी राजे शारीरिक यष्टी ने मजबूत होते. ते अनेक युद्ध कौशल्या मध्ये प्रवीण होते प्राथमिक प्रशिक्षण त्यांना जिजाऊ आणि महालातील अनेक शिवरायांच्या सहकर्या कडून मिळाले.
शिवाय संभाजी राजांना बालपणापासून च एक प्रकारे प्रत्यक्षित ज्ञान (practical knowledge ) मग ते राजा जयसिंग बरोबर भेट असो किंवा आग्रा भेट या मधून संभाजी राज्यांना भविष्यातील अनेक डावपेज शिकण्यास मिळाले.
खरे पाहिले तर अनेक गोष्टी संभाजी राज्यांनी स्वतःहून आत्मसात केल्या आहेत मग ते व्यवहारिक ज्ञान असो राजकीय डावपेज असो युद्ध नियोजन असो किंवा पारमार्थिक ज्ञान .संभाजी राजे बालपणीच संस्कृत शिकल्यामुळे पुढे त्यांनी अनेक संस्कृत श्लोक लिहिले संभाजी राज्यांना बालपणापासूनच नृत्य गायन या मध्येही रस होता .आणि हे सर्व ते स्वतःहून शिकले.
स्वतःहून शिकण्याची प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या संभाजी राज्या कडून आपण बाल्यावस्थेतीअनेक गुण शिकू शकतो संकटे कितीही असो पण मनातील प्रबळ इच्छाशक्ती संपू द्यायची नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा