मावळे शहाजी राज्यांचे पुत्र म्हणून तुमच्या मागे उभे आहे । दादोजींच्या कटू शब्दांचा शिवरायांवर परिणाम
शिवरायांनी स्वराज्याच्या सुरुवातीला अनेक संकटांचा सामना केला अनेक वेळा अशा काही परस्थितीला सामोरे जावे लागले. ज्याचा सामना आज आपण केल्यावर छाती धडधडून येईल .ज्यावेळी शिवरायांनी तोरणा दादोजींना पूर्ण कल्पना न देता जेव्हा हातगत केला. त्यावेळी दादोजी कोंडदेव यांना अत्यंत दुःख झाले शहाजी राजांनी ही एक वेळी निजामशाही विरुद्ध बंड पुकारला व कमी सैनिक व आप आपसातील वैरी मुळे तो बंड निजामाने मोडून काढला.
आता त्याच पित्याच्या पावलावर पुत्र चालत आहे ,याचा दादोजींना मनोमनी आनंद होता. पण शहाजी राजे सारखच शिवरायांचा बंड मोडून काडू नये ,असे ही दादोजींना वाटत होते .
ज्यावेळी तोरणा शिवरायांनी हास्तगत केला, त्यावेळेस मनोमनी आनंदीत झालेले दादोजी तोरणा मोहिमेविषयी त्यांना काही न सांगितल्या मुळे काही रागात शिवरायांशी बोलू लागले ते शिवरायांना ते म्हणाले की -"आता तुम्ही मोठे झाला आमची काहीही गरज राहिली नाही, शहाजी राज्यांनी ज्या विश्वासाने येथे पाठवले तो विश्वास आम्ही ठेऊ शकलो नाही .अम्हाला तुमची काळजी शहाजी राज्या बरोबर जे झाले ते तुमच्या बरोबर नाही व्हावे शिवबा हीच आमची इच्छा, स्वराज उभं करायचं म्हणजे मानस लागतात, पैका लागतो, आत्ता जे मावळे तुमच्या मागे उभे आहे ते फक्त शहाजी राज्यांचे पुत्र म्हणून शिवाजी राजे म्हणून नाही. ह्या माणसांना तयार करायचा म्हणजे यांच्यात विश्वास निर्माण करावा लागतो." या शब्दांनी शिवरायांना रागही आला आणि वाईट ही वाटले. पण त्यांना माहीत होते की दादोजींना आपल्या पेक्षा जास्त परिस्थितीचा अनुभव आहे.
दादोजींच्या शब्दांनी शिवरायांत स्व प्रतिभेची स्वतःच्या क्षमतेला परखन्याचा अंकुर रोवला गेला.
या पुढील भागात आपण शिवरायांनी वडिलांच्या धनाचा वापर न करता स्व क्षमाता वापरून सुरवातीचे यश कसे मिळवले ते पाहू.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा