ग्रामविकास हा देश विकासाचा पाया आहे, हा दुरदृष्टीकोन ज्या संतांचा होता असे तुकडोजी महाराज. भारतात ग्रामीण भाग सर्वात जास्त आहे. तो जर सुजलाम सुफलाम झाला. तर देश प्रगती पथावर जाण्यास कोणीही रोखु शकणार नाही.
हे भविष्यातील स्वप्न ही तुकडोजी महाराज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते.
युवाच भविष्यात भारत विकासात सर्वात महत्वाची भूमिका आहे, ही बाब सुद्धा तुकडोजी महाराजांच्या लक्षात आली होती. पण त्या अगोदर महिला सुशिक्षित होणं ही आवश्यक आहे कारण त्याच अशा युवकांना घडवू शकतील हे विचार सुद्धा तुकोडजी महाराजानी इंग्रज भारतावर राज्य करत होते तेव्हाच विचार केला होता. आणि यासाठी त्यांनी प्रयन्त ही केले होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. वडिलांचे नाव बंडोजी तर आईचे नाव मंजुळा बाई.
तुकडोजी महाराज यांचे खरे नाव माणिक बेंडोजी इंगळे. पण तुकडोजी हे नाव महाराजांना त्यांच्या गुरूंनी दिले.
समाज प्रभोधनासाठी तुकडोजी महाराज ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. तर ते खंजिरी या आपल्या काव्यरचनेतून महाराजानी समजला मोलाचे संदेश दिले.
इंग्रज शासन काळात महाराजानी स्वातंत्रतेसाठी पर्यंत केले. यासाठी त्यांना कारावास सुद्धा भोगावा लागला.
भारत स्वतंत्र झाल्या नंतर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी त्यांच्या कामगिरी बद्दल त्यांना राष्ट्रसंत हे पहिल्यांदा संभोधले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दुरदृष्टीकोन ठेवणारे होते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातीप्रथा, नशाबंधी या सारखे अनेक महत्वाचे कार्य महाराजानी केले . भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले.
तुकडोजी महाराज यांचे कार्य अजच्याही कालावधीत प्रेरक राहील.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा