रंगपंचमी भारत खंडात प्राचीन काळापासूनच हा सण साजरा केल्याचे अनेक पौराणिक कथा मधून आढळून येते जसे राधा कृष्ण जेव्हा मथुरेत होते त्या ठिकाणी गोप गोपिका (जे दूध जन्य प्राण्यांचे पालन करायचे )त्या कालावधी तेथील प्रजेने हा सण सुरू केला असावा असा उल्लेख अनेक ग्रंथामध्ये आदळून येतो त्याच बरोबर भगवान कृष्ण आणि राधा जेव्हा बाल्य अवस्थेत होते तेव्हा रास क्रीडा म्हणजेच बाल्य अवस्थेतील खेळने (ज्याचा अर्थ आज चुकीच्या अर्थाने घेतला जातो) या खेळामध्ये रंग लावणे आनंद उत्सव साजरा करणे असे अनेक क्रीडा कृष्ण भगवान करत असत त्यामुळेच पुढे जाऊन हा सण वसंत पंचमी (उन्हाळ्यात साजरा केला जाणारा सण ) म्हणून रंग पंचमी म्हणून हा सण नाव रुपास आला असावा.
त्याच बरोबर या सणाला प्रेमाचे प्रतीक म्हणून सुद्धा संबोधले जाते .ज्यामध्ये माता पार्वती आणि शंकर भगवान वसंत पंचमीच्या दिवशीच प्रथम दर्शी एक मेकांना भेटले होते .
रंगपंचमी हा सण प्रत्यक राज्यात विविध पद्धतीने साजरा केला जातो .महाराष्ट्रात या रंगपंचमीला गोड पुरण पोळीचा स्वयंपाक केला जातो .तर राजस्थानात नृत्य करून हा सण साजरा केला जातो. तर उत्तर प्रदेशात रंग उडवून हा सण साजरा केला जातो.
हा सण साजरा करताना सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो.
पण मूळ रंग पंचमीत उन्हाळ्यातील शरीराला थंड ठेवतील अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो. त्या मुळे सर्व वाचक प्रेमींना आग्रहाचे म्हणणे की पाण्याची नासधूस करण्या पेक्षा शरीराला व मनाला थंड ठेवतील अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर करून ही रंग पंचमी साजरी करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा