निजाम, मुघलांचे अत्याचार बघितल्याव जिजामातेच्या मनात तसेही ज्वाला भडकत होती. आणि हीच ज्वाला जिजाऊंनी शिवरायांच्या मनात बालपणापासूनच रुजवण्यास सुरुवात केली.
त्यात शिवरायांचे विचारही बालपणापासून प्रखर व अन्यायाविरुद्ध वाचा फोडनारे होते. बालपणापासूनच निजामशाही चे अत्याचार, हिंदूंचा होणारा छळ, जनतेची लूट असे सर्व वातावरण एक निजामशाहीतील नामी सरदारांचा पुत्र असताना शिवराय पाहत होते. जेथे समोर सर्व सुख सुविधां होत्या तरीही सामान्य जनतेसाठी काही कर्तुत्व करून दाखवन्याचे शिवरायांनी ठरवले.
ज्या वयात आपण नववी,दहावी चे पेपर देत होतो. त्या वयात शिवरायांनी स्वराज्य स्थापण करण्याची शपथ घेतली. तीही बारा मावळ रानातील त्या योध्याबरोबर जे शिवराया पेक्षा वयाने मोठे होते.
छत्रपती शिवरायांनी मावळ्यामध्ये मातूभूमी, देशप्रेम या विषयी जागृत केले, आणि वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ रोजी रायरेश्वराच्या मंदिरात सर्वा समावेत एक शपथ घेतली.
शिवपिंडीवर बेलपत्र वाहताना शिवराय देवाला म्हणाले की " हे शंभू महादेव तूझ्या साक्षीने आम्ही सर्व शपथ घेतो की ही हिंदू भूमी या म्लेंच्छ्याच्या तावडीतून मुक्त करू.
वायच्या सोळाव्या वर्षी एवढं मोठ धाडस दाखवण दादोजींना ही आचार्य चकित करणार वाटलं. शिवरायांनी घेतलेली शपथ पूर्ण करूनही दाखवली.
मित्रानो जीवनात लवकर कुठलेही निर्णय घेतले तर आयुष्याचा पुढील मार्ग कोणता हे स्पष्ठ होते. हेच शिवरायांच्या रायरेश्वराच्या मंदिरातील शपथ वरुन लक्षात येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा