छत्रपती शिवरायांना आवश्यक होतं, ते प्रथम किल्ल्यामध्ये प्रवेश करण, कारण त्याशिवाय पुढील योजना आखण अवघड होतं, शिवाय निळोजीला थोडा जरी अविश्वास निर्माण झाला, तर किल्ल्यावर जाण अवघड होते. त्यामुळे शिवरायांनी योग्य संधीची वाट पाहिली.
संक्राजी ,व पिलाजी यांनी निळोजीची समजूत घालून, शिवरायांना दिवाळी सणाच्या दरम्यान निमंत्रण पाठवलं.निळोजीचा ही विश्वास शिवरायांवर होता, त्यामुळे त्याने निमंत्रिनाचे ताबडतोब पत्र पाठवले. आणि हीच संधी शिवरायांना नामी वाटली. शिवराय ताबडतोब तानाजी, जिवाजी या सवंगडया सह किल्यात दाखल झाले.
निळोजी तसा लोभी व भोगी पद्धतीचा होता. मद्य पिणं महिलांचे नृत्य बगण यातच तो आपलं आयुष्य घालवत होता. संध्याकाळी महिफिल बसल्यावत दिवाळी असल्यामुळे निळोजी ने शिवरायांना घाबरत मद्य देण्याचा पर्यंत केला.पण मात्र शिवारायनी हसत म्हणाले की मद्य आम्हाला वर्ज्य आहे ,पण आम्ही त्या जागी सरबत घेऊ .निळोजी ने ही सरबत आणण्यास आदेश दिला.
संक्राजी व पिलाजी याच दरम्यान शिवरायांकडे बघत होते. योजना आधीच ठरली होती. निळोजी मद्यपाना मध्ये पूर्ण दुबल्या नंतर ठरल्या प्रमाणे शिवरायांनी रात्री किल्ला ताब्यात घेतला. जेव्हा ही गोष्ट निळोजीला भानावर आल्यावर लक्षात आली, तेव्हा तो शिवरायांच्या कैदेत होता.
"धोका शिवाजी राजे तुम्ही आमच्या बरोबर धोका केला ,आम्ही तुमच्या वर विश्वास ठेवला ,आणि तुम्ही आमचा विश्वास घात केला. यावर शिवराय कडाडले. "आम्ही विश्वास घात केला की तुम्ही. तो निजाम आपल्या आई बहिणीची आबरू लुतोय आणि तुम्हीही त्यांच्यातच शामिल झाला. भावांचा अधिकार काढून घेतला हे कोणत पुण्याच काम केलं.आम्ही तुम्हाला स्वराज्यकडून या यासाठी विनंती ही केली,ती सोडून तुम्हीही त्या निजामा सारखे वागू लागल्यावर हिंदू भूमीच काय होईल"
निळोजी कडून किल्ला काढून घेतल्यावर शिवरायांनी किल्यावर दोघांना समान अधिकार दिला. व दोघा कडूनही स्वराज्यासाठी कार्यरत राहण्याची आश्वासने घेतली.
या द्वारे निजामाला कुठलीही भनक न लागता शिवारायनी पुरंधर स्वराज्यात आणला.
शिवरायांनी पुरंधर स्वराज्यात आणताना कोठलेही कपट वापरले नाही, कारण श्री राम यांनीही जर पाहिले तर दृष्ट् बालीला झाडा मागूनच वार केला होता, कारण बालीने सुग्रीवाच्या पत्नीला बंदी बनवून ठेवले होते. आणि येथे निळोजी नेही हिंदूंचे रक्षण करण्याचे सोडून स्वतःच्या भोगामध्ये लिप्त झाला होता. शिक्षा होणं तर आवश्यकच होत.
न युद्ध करता किल्ला जिंखन हा शिवरायांचा गनिमी कावाच होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा