जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
छत्रपती शिवरायांचा छावा म्हटले जाणारे वीर संभाजी महाराज ज्यांनी अखेरच्या श्वासा पर्यंत मुघलांशी लढा दिला. ज्यांच्या शौर्या पुढे औरंगजेब सुद्धा नमला होता. त्या छ .संभाजी महाराजांवर अनेक वेळा हा आरोप राज्यांचे विरोधक लावत होते , की संभाजी महाराज युवा अवस्थेत असताना मुघलांना जाऊन मिळाले.पण मूळ तथ्य आणि इतिहासकार मात्र वेगळेच सांगतात .
छत्रपती संभाजी महाराज जेव्हा युवा अवस्थेत होते तेव्हा त्यांचे रक्त सळसळते होते. पण आंतरिक स्वराज्यात शंभू राज्या विरुद्ध मात्र वेगळेच कट शिजत होते.छ संभाजी महाराज जेव्हा नवीन मोहिमेवर निघण्याची तयारी करत तेव्हा अनेक विरोधक ती मोहीम हातातून काढून वेगळ्या किल्ल्यावर फक्त देखरेख करण्यासाठी शिवरायांना सांगून पाठवत. ज्यामुळे संभाजी महाराजांना नवीन काही शिकताच येत नव्हते. त्यामुळे अनेक वेळा त्यांचे शांत मन अस्थिर व्हायचे .
एकदा छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्याच शेजारी असलेल्या काही किल्यांची देखरेख करत होते. शेजारी मुघलांच्या किल्लेदार महाबत खान होता .जेव्हा त्याला ही गुप्त माहिती कळली की संभाजी महाराज शेजारील काही किल्याना भेट देत आहे व स्वराज्यात संभाजी महाराजा विरुद्ध जे कट शिजत होते. याचा गैर वापर करून खानाने संभाजी महाराजाना एक पत्र लिहिले ज्यामध्ये त्यांचा स्वराज्यात चाललेला अपमाना बद्दल उल्लेख करून मुघल आजही आपली वाट बघत आहे, असे लिहिले संभाजी महाराजांना खानाचा डाव लागोलाग समजला पण शत्रू आतून किती मजबूत आहे हे समजून घेण्यासाठी शंभू राजे खानाला भेटायला गेले. खानाने सुरूवातीला शंभू राज्यांचा आदर सत्कार केला, पण जेव्हा शंभूराजे खानाची भेट घेवून निघाले तर खानाने शंभूराजे ना किल्ल्यातच म्हणजे न कैद खान्यात टाकत फक्त किल्ल्यात धरून ठेवले आणि स्वराज्यात ही चुकीची माहिती फिरवली की संभाजी महाराज मुघलांना येऊन मिळाले.
आणि या बातमीला हवा देण्याचे काम केले शंभू राज्यांच्या विरोधकांनी. पण एवढे असूनही चार ते पाच वर्ष मुघलां कडे राहून मुघलांच्या अनेक अंतरीक बाबी शंभू राज्यांच्या लक्षात आल्या आणि याचाच वापर त्यांनी औरंगजेब जेव्हा चालून आला त्यावेळेस त्यालाअडवण्यासाठी केला .
त्यामुळे असे म्हणणे अयोग्य ठरेल की संभाजी राजे मुघलांच्या चंगुळ मध्ये अडकलेले होते या उलट असे म्हणणे योग्य ठरेल की त्या कैदेच्या कालावधीत मुगलच शंभू राजेंच्या चंगुळ मध्ये अडकले होते.
छत्रपती संभाजी महाराज शब्द वापर मित्रा 🚩🙏🚩
उत्तर द्याहटवाहो भावा नक्की
उत्तर द्याहटवा