हे राज्य रामसारख्या माझ्या थोरल्या बंधूंचे मी फक्त भरता प्रमाणे राज्य संभाळतोय छ. राजाराम महाराजांचे प्रेरक पत्र
२४ फेब्रुवारी १६७० रोजी राजाराम महाराजांचा जन्म रायगडावर झाला छ. राजाराम महाराज म्हणजेच सोयराबाई आणि छत्रपती शिवरायांचे कनिष्ठ पुत्र. जेव्हा संभाजी राजे मुघलांच्या कैदेत गेले , तेव्हा रिक्त छत्रपती चे पद राजाराम महाराजानी भरून काढले .
राजाराम महाराज ही वाघाचाच छावा होता , त्यामुळे शिवराया प्रमाणे ते ही शूर वीर होते .संभाजी महाराज कैदेत असताना राजाराम महाराजानी कमी धन सैन्य असूनही मुघल ला विरुद्ध सुमारे १२ वर्ष लढा दिला .संताजी आणि धनाजी या वीर योध्यांच्या मदतीने गनिमी काव्या चा वापर करून अनेक वेळा मुघलांना पाणी पाजले .राजाराम महाराज अनेक वेळा मुघलांशी लढा देण्यासाठी स्वतः मोहीम हाती घेत . त्यामुळे सामान्य सरदारामध्ये जोश येत ,राजाराम महाराज धोरणी आणि शांत विचारांचे होते . सुरवातीच्या कालावधीत राजे झाल्या नंतर सोबतीला चुकीच्या सारदारामुळे मद्य च्या आहारी गेले. पण जेव्हा त्यांना शिवरायांचे स्मरण झाले तर वाईट वाटून पुन्हा ते स्वराज्य राखण्यास सुरुवात केली.
औरंगजेबाने जेव्हा वतन दारी देऊन मराठी सरदारांना स्वतःच्या बाजूला करण्यास सुरुवात केली ,तेव्हा शिवरायांनी बंध केलेली वतनदारी राजाराम महाराजाना पुन्हा सुरुवात करावी लागली.
राजाराम महाराजांनी आपल्या किल्ल्या वरील सरदारांना स्फुर्ती मिळावी म्हणून आपल्या पत्रातून अनेक वेळा ते सारदारांना सांगत की हे राज्य माझा रामा सारख्या मोठा भाऊ संभाजी महाराजांचे आहे मी फक्त भरता प्रमाणे हे राज्य संभाळतोय असे विचार राजाराम महाराजांचे होते.
१२ वर्ष मुघलांशी झुंज देणाऱ्या या विराने ३ मार्च १७०० रोजी सिंहगडावर अखेरचा श्वास घेतला.
(आणि ४ एप्रिल ला त्यांची पुण्यतिथी साजरी केली)
आशा सामर्थ्य शाली योध्यास आपल्या सर्वांकडून विनम्र अभिवादन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा