भारतात काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .
एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.
पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .
शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.
शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत आपण विजय( success) मिळवू शकतो. हे समजून घेणे आवश्यक आहे.
जगात असे अनेक देश आहे जेथे शिवरायांचा इतिहास शिकवला व समजून घेतला जातो .अमेरिकेत लष्कर विभागात सेनेला युध्दाविषयी प्रशिक्षण देताना शिवरायांचा गनिमी कावा शिकवला जातो.
आवश्यक आहे आपल्या देशानेही शिवरायांचा इतिहास नवीन पिढीला समजेल यासाठी इतिहासाच्या पुस्तकासह प्रत्यक घरात शिवरायांच्या प्रतापाविषयी गुणगान गायले गेले हवे.
शिवतेज दीना निमित्त सर्वाना सुभेच्छा
Hariom ganuche
उत्तर द्याहटवा