जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
माघ शु १५ (२७ फेब्रुवारी )कवी कुसुमाग्रज यांच्या जन्म दिना निमित्ताने का होईना आपण एक दिवस मराठी चे महत्व समजून घेण्याचा प्रयन्त करतो. नाहीतर इतर वेळेस आपण इंग्रजीलाच महत्त्व देत बसतो, नक्कीच इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हटले आहे पण आईच्या दुधा शिवाय जगू तरी कसे शकू . याच ठिकाणी जर आपण कर्नाटक, तामिळ लोक आपल्या भाषेला किती महत्व देतात हे लक्षात .येईल फ्रांस मध्ये तर लोक इंग्रजीला फक्त परदेशातील लोकांशी संवाद साधण्याचे साधन मानतात नाहीतर ज्याला फ्रांस भाषा येत नाही त्याला नोकरी नाही असा तेथील सरकारचा कायदाच आहे. आणि आपल्या देशात ज्याला इंग्रजी येते तोच जसा उच्च शिक्षित. ज्ञानेश्वर माऊली तर म्हणते - माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैज जिंखे ज्या ज्ञानेश्वर माऊलीच्या ओवीवर विश्व स्तरावर संशोधन केले जाते त्या मराठी तरी आपण कमी समजायला नको . आज पासूनच आपण आपल्या मुलांना इंग्रजीचे बळजबरीचे शिक्षण देण्या पेक्षा मराठीतून व्यवहारी उदयोग (व्यवसाई) ज्ञान दिले हवे कारण लाभले आम्हास भाग्य बो...