मित्रांनो आजच्या या युगात Technology मुळे सर्व गोष्टी पटकन आपल्याला मिळतात. क्षणार्धात विमानामुळे दूर देशी जाता येते. फोनवर सुद्धा दूर देशी बसलेल्या मित्राशी पटकन बोलता येते .
पण या सर्व गोष्टी मानवाने भोग आणि चंचल मनाला पटकन मिळाव्यात म्हणून केल्या आहेत ,एका बाजूने या गोष्टी बरोबर तर आहे. पण दुसऱ्या बाजूने अनेक वाईट परिणाम पहावे लागत आहे.
रामराज्य म्हणजे त्रेतायुगात रामाचा आदर्श ठेऊन सर्व राहत होते. राम स्वतः मर्यादा पुरुषोत्तम होते. शांतपणा ,विवेक, धेंर्य ,नेतृत्व, युद्धकोशल्य हे गुण रामाचे जसे इंद्रियच होते.
पण आजच्या कलियुग कालावधीत मर्यादा, संयम शांतपणा, विवेक हे गुण तर सोडाच ,पण अनेक मानसिक आजार वाढत आहे. चंचलता, आणि पटकन मिळवण्याच्या लोभात अनेक वाईट काम करण्यास आज माणूस मागे पुढे पाहत नाही ये .
रामराज्यात आजार कमी होते ,लोक शक्तीशाली होते .नाती, नीती आणि पारंपरिक गोष्टीचे पालन करत, लोक सतत कार्यात असत ,धार्मिक गोष्टीना मान देत असत.
पण आज नात्यांमधील गोडवा कमी होऊन डायबिटीजचा गोडवा मात्र वाढला आहे. भारतात आज 15 कोटी लोक आज बेरोजगार आहे . नीती ,परंपरा , धार्मिक गोष्टीना पुराण काळातील मानून युरोपियन देशातील परंपरांचा स्वीकार केला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा