माघ शु १५ (२७ फेब्रुवारी )कवी कुसुमाग्रज यांच्या जन्म दिना निमित्ताने का होईना आपण एक दिवस मराठी चे महत्व समजून घेण्याचा प्रयन्त करतो. नाहीतर इतर वेळेस आपण इंग्रजीलाच महत्त्व देत बसतो, नक्कीच इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हटले आहे पण आईच्या दुधा शिवाय जगू तरी कसे शकू .
याच ठिकाणी जर आपण कर्नाटक, तामिळ लोक आपल्या भाषेला किती महत्व देतात हे लक्षात .येईल फ्रांस मध्ये तर लोक इंग्रजीला फक्त परदेशातील लोकांशी संवाद साधण्याचे साधन मानतात नाहीतर ज्याला फ्रांस भाषा येत नाही त्याला नोकरी नाही असा तेथील सरकारचा कायदाच आहे. आणि आपल्या देशात ज्याला इंग्रजी येते तोच जसा उच्च शिक्षित.
ज्ञानेश्वर माऊली तर म्हणते -
माझ्या मराठीची बोलू कौतुके
परी अमृता ते ही पैज जिंखे
ज्या ज्ञानेश्वर माऊलीच्या ओवीवर विश्व स्तरावर संशोधन केले जाते त्या मराठी तरी आपण कमी समजायला नको .
आज पासूनच आपण आपल्या मुलांना इंग्रजीचे बळजबरीचे शिक्षण देण्या पेक्षा मराठीतून व्यवहारी उदयोग (व्यवसाई) ज्ञान दिले हवे कारण
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
हे भाग्य आपल्या मुलांच्या लक्षात येईल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा