प्रत्येक पित्याला वाटते की आपल्या पुत्राने आपल्या आज्ञात रहावे. पण शिवराय असे कसे की ज्या वेळी आदिलशहाने शहाजीराजांना कपटाने कैद केले, आणि त्यांना खाल्या मिठाची आन देऊन बळजबरीने शिवरायांना सर्व जिंखलेले किल्ले देऊन समर्पण करण्यास ये असा मजकूर लिहिण्यास शहाजीराजांना सांगितले. आणि नाईलाजाने शहाजीराजांना ही तसे करावे लागले. आणि एवढे शहाजीराजांचे पत्र आल्यावरही शिवरायांनी आपले हल्ले आदिलशाही किल्यावर चालूच ठेवले. त्याचे कारण असे होते की, शहाजीराजांना ही आंतरिक मनातून शिवरायांच्या कार्याचे कौतुक वाटत होते. व ते आशीर्वाद ही देत होते. कारण जे शहाजीराजांना करायचे होते. पण फंद फितुरीमुळे झाले नाही ते स्वराज्याचे स्वप्न आपला पुत्र करत होता ,याचा त्यांना अभिमानच होता. आणि शिवराय मनातून हे जाणतच होते. आणि शहाजी राजांनी ही त्या पत्रातून सांकेतिक भाषेत शिवरायांना आदेशच दिला होता.
शिवराय किती आज्ञाधारक होते याचे अजून एक उदाहरण म्हणजे ज्यावेळी नेस्तनाबूत झालेले पुणे शिवरायांना पुन्हा बसवायला सांगितले आणि एक उध्वस्त प्रदेश आपल्याला जहागिरी साठी याचा विचारही न करता पित्याची आज्ञा शिरासावंद्य मानली .
पूर्ण इतिहासातून फक्त एका पुत्रा नेच आपल्या पित्याचे स्वप्न पूर्ण केले, कारण शहाजी राजांचे ही स्वप्न स्वराज्य होते ,आणि ते शिवरायांनी पूर्ण केले होते.
वरील माहिती वरून एवढेच तात्पर्य लक्षात येते की-
१ शिवराय शहाजीराजांची आज्ञा फक्त बाहेरून (physicality) ऐकत नव्हते, तर आंतरिक (intarnaly) मनातून ऐकत होते.
2.जे आपण करू शकलो नाही ते आपल्या पुत्राने करून दाखवले.
आजच्या काळात आपल्या कष्टकरी पित्याची किती आज्ञा मनापासून मानतो, हे शिवरायांना आपला मित्र मित्र मानून त्यांच्याशी त्यांच्याशी तुलना केली तर लक्षातच येईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा