आजच्या सरकारला आहे, ते रस्ते आणि आहे त्या सरकारी वास्तू ( शाळा, दवाखान .इ) निट व्यवस्थित ठेवता येत नाहीत. आणि शिवरायांनी तर उद्वस्त पुणे वसवले आणि शिवरायांनी याच पुण्यातून स्वराज्याची सुरुवात केली.
शाहजीराजे यांनी जेव्हा आदिलशाही विरुद्ध बंड पुकारला तेव्हा तो मोडूनन काढण्यात आला. त्यानंतर मुरार जगदेवणे आदिलशहाच्या आदेशाने पूर्ण पुणे उध्वस्त केले.
शिवरायांना पुण्याची जहागीर मिळाली .त्यावेळी पुण्यातील सर्व जनता इतर प्रदेशात निघून गेली होती आणि जी होती तीही दऱ्या खोऱ्या मध्ये लपलेली होती. या सर्वांना शिवरायांनी आणि दादोजींना रक्षणाचा भरोसा देऊन पुणे वासवण्यास सुरुवात केली.
सुरुवातीलाच त्यांना गणरायाचा कौल घडला. ज्या ठिकाणी शिवरायांच्या लाल महालाचे काम करीत होते. त्या ठिकाणी गणरायाची मूर्ती सापडली हे ऐकताच प्रजा जमू लागली .
१.सोन्याचा नांगर सोन्या सारखे पीक
जनतेत विश्वास यावा यासाठी जेव्हा जिजाऊंनी व शिवरायांनी सोन्याचा नांगर बंजर जागेवर (शेतात) फिरवला, तेव्हा जनतेला विश्वास पटला की हा राजा शेतकऱ्यांसाठी नक्की कार्य करेल.
( शिवरायांनी स्वराज्याचे कार्य जर पहिले तर त्याची सुरुवातच शेतकऱ्या पासून केली, असे दिसते त्यांना माहीत होते, की शेतकरीच खरा कर दाता आहे. राज्यातील प्रजेला धन धान्य पुरवण्याचे काम शेतकरीच करत असतो आजही तसेच आहे. शेतकरी कच्चा माल देतो म्हणूनच तर उद्योग धंदे चालतात लोकांना रोजगार मिळतो ,पण आजचे राजकारणी नेते निवडणुकी साठी फक्त businessman च हाताशी धरतात आणि एक दोन वर्षासाठी सुद्धा यांचे सरकार टिकत नाही.)
२.वाडा निवड
जनतेचे गऱ्याने ऐकण्यासाठी जिजाऊंनी प्रथम लाल महाल त्यांच्या मधोमध बांधला जिजाऊ जातीने त्यांची गऱ्याने ऐकत होत्या त्यामुळे प्रजेचा अधीकच विश्वास वाढला .
(पण आजच्या राजकीय नेत्याचे आलिशान बंगले मात्र मुंबईला आमदार खासदार निवास म्हणून खऱ्या निवडून आलेल्या क्षेत्रापासून दूर असतात.)
3.माणसांची निवड, निर्मिती आणि प्रशिक्षण
पुणे जेव्हा वसवले, तेव्हा दादोजींना आणि शिवरायांनी मजबूत विश्वासु माणसे प्रजेतून सापडून निरखून प्रशिक्षणास सुरुवात केली .ज्यामध्ये तानाजी येसाजी असे अनेक विर ही होते.
( पण आजचे नेते सामान्य तरुणाना धनाचा लोभ देऊन व्यसनी लावतात, आणि निवडणूक की पुरते वापर करतात.)
४.पारितोषिके
कोल्ह्याचे भय त्या उद्वस्त पुण्यात जेव्हा होते, तेव्हा दादोजींनी आणि शिवरायांनी त्यांना मारण्यासाठी पारितोषिक ठेवली, ज्यामुळे जनतेत उत्साह वाढला आणि त्यामुळे अनेक वीर ही समोर आले.
( आजच्या कालावधीत अशी पारितोषिक फार कमी प्रमाणात देण्यात येतात.)
५.सामाजिक कार्य
पुणे वसवल्या नंतर कायदे बनवण्यात आले प्रजेच्या गाऱ्हान्यावर पटकन कार्यवाही होऊ लागली. महिलांचे रक्षण, शेत रक्षण, युवकांना प्रशिक्षण, शेतकऱ्याकडून योग्य कर आकारणी ,फळबाग झाडे लागवड,नवीन वस्ती बांधणार्यांना आर्थिक मदत अशी अनेक छोटी मोठी कामे पटकन होऊ लागली. त्यामुळे पुण्यामध्ये राहण्या साठी प्रजा आकर्षित होऊ लागली.
(आणि आज नीट नियोजन नाहीये म्हणून नोकऱ्यासाठी युवक देश सोडत आहे.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा