गणरायाचे विवेकबुद्धी व शांतपण हे अतुलनीय गुण
अगोदर च्या भागात गणरायाच्या चातुर्य या गुणाचा मागोवा घेतला या भागात आपण विवेक बुद्धी व शांतपणा या गुणांचा मागोवा घेऊ -
विवेक बुद्धी या गुणांचा आपल्या जीवनात असामान्य महत्व आहे .आपली बुद्धी विवेकी स्थिर ,व परस्थितीनुसार निर्णय करणारी असेल तर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. क्रोध नियंत्रित करू शकतो हे पुढील कथेवरून लक्षातच येईल-
ती कथा आपल्या सर्वानाच माहित आहे .जेव्हा देवानं वादविवाद सुरु झाला, कि प्रथम पूजनाचा मान कोन्हाला याचे उत्तर म्हणून ब्रम्हदेवाने स्पर्धा आयोजित केली, कि जो कोण्ही संपूर्ण ब्रम्हांडाला चक्कर मारिल तो विजयी . मातापार्वतीनी गणराया व कार्तिकेय या दोघांना या स्पर्धेत भाग घेण्यास सांगितल. या ठिकाणी गणरायाचे वाहन मूषक होते तरीही गणरायाने भाग घेतला. जेव्हा स्पर्धा सुरु झाली तेव्हा गणराया सर्वात मागे होते .तरीही गणरायाने योग्य निर्णय घेत आपले मातापिता यांना चक्कर मारला .जेव्हा याचे कारण गणरायाला विचारले तेव्हा गणरायाणे सांगितले कि जर मातापित्यातच जर सम्पूर्ण ब्रह्मांड आहे तर इतरत्र का फिरू
या कथे वरून आपण अनेक महत्वाच्या बाबी स्पष्ट होतात जसे कि -
१. गणरायाचे वाहन मूषक होते तरीही गणारयाने स्पर्धेत भाग घेतला आपली बाजू नाजूक आहे कि नाही याचा त्यांनी स्पर्धेत विचार देखील केला नाही.
( नाहीतर आपण आपली बाजू जर नाजुक असेल तर त्याचाच विचार करत बसतो व स्पर्धे पूर्वीच माघार घेतो )
२. गणरायाने स्पर्धेत फक्त माझाच वीजय व्हावा म्हणून सहभाग न घेता मातेचा आदेश व कर्त्यव्य म्हणून भाग घेतला .
(पण जर आपण आपला विचार केला तर मात्र प्रत्येक क्षेत्रात माझाच विजय व्हावा अशी अपेक्षा बाळगतो व नाही प्राप्त झाल्यास दुःखी होतो)
3. वाहन मूषक जोरात चालत नाही याचा राग गणरायाने मूषक वर काढला असता, पण त्याही ठिकाणी संयम ठेवत विवेकाने वेगळ्या मार्गाने पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला ,व मतापित्यामद्धेच संपूर्ण जग सामावलेलं आहे हा विवेकी विचार जगासमोर मांडला.
(पण आपण आपल्या अपयशाचा दोष दुसऱ्यावर टाकून मोकळे होतो.)
विवेकी व संयमी विचारवंतांचे मोठे व उदान्त विचार असू शकतात जसेकी गणारायाने जय पराजया पेक्षा मातापिताच जगा पेक्षा श्रेष्ठ आहे याला महत्व दिले व विजय शेवटी गणारायचाच झाला.
त्यामुळेच गणरायाचे जर आपण नित्य पठण केले गणपती स्तोत्राचे नित्य पठण केले तर आपलीही बुद्धी विवेकी शांत व संयमी होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा