महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले. त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे-
१.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध
दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.
२.अशक्य गोष्टीस योजना_
महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला युद्धासाठी लालकरल्यावर तो चकित झाला. युद्धात हरल्यावर महिषासुर दुर्गा मातेला शरण आला. (मातेची पूजा केल्यामुळे आज महिषासुराला म्हसोबा म्हणून सुद्धा ओळखलं जातं.)
त्याच बरोबर रक्तबीज नावाच्या राक्षसाला वर होता, की त्याचे रक्त जमिनीवर पडल्यावर त्याच्यासारखाच एक नवीन राक्षस निर्माण होत. त्यामुळे रक्तबीजाचा वध होणं अशक्य होत. पण दुर्गा मातेने त्याच्याशी युद्ध करताना त्याच्या रक्ताला एका काटोरित जमा केले. व तेच रक्त काली माता अवतार घेऊन पिऊन टाकले व रक्तबीजाचा वध झाला.
३.चांगल्या विचारांचा सांभाळ दृष्टांचा विनाश_
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ या श्लोका प्रमाणे मातेने पुण्य वंतांच रक्षण केले व वाईटाचा विनाश केला.
आपणही आपल्या अंतरंगातील वाईट विचारांचा विनाश करणे ,व चांगल्या विचारांचा सांभाळ करणे, आवश्यक आहे.
४. करा शांत मनाला_
तब्बल नऊ दिवस राक्षसांशी युद्ध केल्यानंतर दुर्गा मातेचे शरीर पूर्ण तप्त झाले होते .भक्तांनी मातेला शांत करण्यासाठी पंचामृताने, निंबाच्या पाल्याने स्नान घातले व त्यामुळे दुर्गा माता शांत झाल्या.
वाईट विचारांशी लढून जर आपलं मन लढून तप्त होत असेल तर दुर्गामतेची भक्ती करून मनाला भक्तीचे एक प्रकारे स्नानच घातले पाहिजे.
५.दुर्गा मातेची कीर्ती _
राक्षसांचा वध केल्यावर देवांनी मातेची पूजा करून मातेला महिषासुरमर्दिनी पण म्हटले जाऊ लागले .यामुळे मातेची महती सर्वदूर पसरली.
आपणही जर वाईट कृती ,कार्य, विचार यांच्या विरुद्ध लढून जर आपले चरित्र घडवू शकत असेल तर आपणही दुर्गामाता व शिवरयाप्रमाणे आपली कीर्ती सर्वदूर पसरवू शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा