सावित्रीबाई फुले इतिहासातील एक उत्कृष्ट शिक्षक
मित्रानो इतिहासात नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जावे व ते पुढील पिढीने आदर्श मानून प्रेरित होणे गरजेचे आहे पण इतिहासात नाव कोरने काही सोपी गोष्ट नाही सावित्री बाईंनी इतिहासात नाव कोरले जावे म्हणून काही हट्टहास धरला नव्हता समाजाचे हित इच्छुन त्यांनी कार्य केले पण समाजाचे हित करताना व त्याच समाजापुढे इतिहासात नाव कोरले जाताना त्यांना अनेक कष्ट सहन करावे लागले ते पूढील काही मुद्यांवरून लक्षात च येईल
अशी ही सावित्रीबाईची शिक्षणाची आवड
बालपणापासून च शिक्षणाची आवड असणाऱ्या सावित्रीबाईंच्या कालावधीत स्त्री ला शिक्षण दिले जात नव्हते.तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही.त्या पुस्तकांना आपला गुरू मनात व त्यांना त्या जपत.
पण आजच्या कालावधीत जर पाहिले तर सर्व उपलब्ध असूनही आजच्या कालावधीतील सावित्री (मुली) सोशिअल मीडियावर गुंतल्या आहे
जहाँ चाह वहा राह
शिक्षणाची आवड असणाऱ्या सावित्रीबाई ना जोतिरावसारखे व्यक्तिमहत्व शिक्षक स्वरूपात मिळाले व त्यांनी त्यांचे कार्य पारही पडले
आजच्या कालावधीत जोतिरावसारखे व्यक्तिमहत्व निर्माण होणे गरजेचे आहे ज्याद्वारे शिक्षणाची गरज असणाऱ्या महिलांना एक राह तरी मिळेल
समाज्याच्या विरोधातकी सावित्रीबाई कणखर
आपल्या सर्वानाच माहीत आहे जेव्हा सावित्रीबाई नि पहिली मुलींची शाळा काढली तेव्हा समाजाचा खुप सारा विरोध झेलवा लागला शेण फेकण्या पासून ते शाळा तोडण्या पर्यंत दृष्ट्यानी कार्य केले पण सावित्रीबाई डगमगल्या नाही
आजच्या काळात अशा शिक्षकाची गरज आहे जे अत्यंत दुर्गम भागातही शिक्षण घेऊन जातील फक्त पगारासाठी नव्हे तर कर्म म्हणून ते कार्य करतील
सावित्रीबाई फक्त शिक्षणाचा प्रसार केला नाही, तर समाज सुधारणा सतिप्रथा विरोध त्याच्याबरोबर प्लेग सारख्या रोगा दरम्यान स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्या रुग्णाची मदत करत ,आणि त्यातच त्यांनाच देहांत झाला आहे
अशा प्रकारचे बलिदान देणारेच इतिहासात आपले नाव कोरु शकतात सामान्य जण नव्हे कारण त्याग केल्यावरच इतिहास घडतो
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा