जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
कोणतेही मोठे लक्ष जर प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी योग्य साथीदारांची साथ असणे गरजेचे आहे. कारण अंतर्गत मतभेद ,अविश्वास आणि फक्त स्वार्थ साधणारे मित्र परिवार जर सोबत असेल ,तर बाहेरील दुष्मणाशी लढून उपयोग तो काय ? पण जर आपण अनेक भारतीय वीरांचा जर विचार केला, तर त्यांनी निस्वार्थ साथीदारांची आणि योद्धाचीच निवड केली आहे.
श्री रामाचा जर विचार केला ,तर त्यांनी बाली पेक्षा सुग्रीवाची निवड केली. पण पौराणिक कथा मध्ये जर पाहिले, तर बालीने रावणाला शेपटीला बांधून सात समुद्रात स्नान केले होते. खरे पाहता बाली कडे शक्ती होती ,की त्याचे आणि त्याच्या विरोधकांचे युद्ध करताना नेत्र एकत्रित झाले ,तर सर्व वेरोधकाची शक्ती बाली मध्ये येत होती. सात विविध स्थानावर असणाऱ्या झाडाना एका बानात भेदनाऱ्याच्या हातून बालीचा वध होणार होता इतक्या शक्ती शालीबालीला सोडून श्रीरामांनी बाली कडून मार खाऊन पळालेल्या बालीचा लहाना भाऊ सुग्रीवाची मदत घेतली या मागील कारण होते ते विवेकी विचार धारेचे.
बाली आणि राक्षसांमध्ये युद्ध होत असताना राक्षस जेव्हा पळून गुफेत लपले, त्यावेळी पंधरा दिवसाच्या आत जर मी राक्षसांचा वध करून परत आलो नाही ,तर तू स्वतः राज्यभिषेक करून घे असे बाली ने त्या गुफेत प्रवेश करताना बंधू सुग्रीवाला सांगितले. पण दोन महिने उलटून गेल्यावर जेव्हा बाली आला नाही तेव्हा राज्याच्या रक्षनासाठी सुग्रीवाने राज्यभेषेक केला .पण त्यावेळी बाली राक्षसांचा वध करून पुन्हा आल्यावर सुग्रीवाचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता बलीने सुग्रीवला राज्या बाहेर काढून दिले .व त्याच्या पत्नीलाही स्वतःकडे ठेऊन घेतले. ही कथा आपण सर्वच जाणतो ,पण इतके झाल्यावरही सुग्रीवाच्या मनात आपल्या भावा विषयी वाईट विचार नव्हता. त्यामुळे च श्रीरामांनी बळा (बाली) पेक्षा समजूत दार विचारांना (सुग्रीवाला) आपला साथीदार निवडले नाही तरी श्रीरामांनी बालीची मदत मागितली असती. तर बाली काही क्षणातच रावणाला श्रीरामाच्या चरणापाशी घेऊन आला असता, पण राकट विचारांचा बाली आपल्या भावावर अविश्वास दाखवत होता. त्याने श्रीरामांना काय समजून घेतले असते.
शेवटी तात्पर्य एवढेच की स्वार्थ मुळक शक्ती शाली मित्रा पेक्ष्या विवेकी आणि शांत मित्र केव्हाही योग्यच.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा