सामाजिक कोणत्याही गोष्टीचे नेतृत्व करायचे असेल, तर त्यासाठी धेंर्य लागते. नेतृत्व करणाऱ्या गोष्टी विषयी माहिती नसताना जर आपण आव आणून नेतृत्व केले, तर मोठी सामाजिक हानी होण्याची शक्यता असते. वस्तूत काही गुण माणसाला जन्मतःच असतात, त्यापैकीच सुभाषचंद्र यांच्यात नेतृत्व हा गुण आढळून येतो.इंग्रज गुलामगिरीच्या काळात आपल्या देशाचे नेतृत्व करून आपण आपल्या देशाला स्वतंत्र करू शकतो असा विश्वास सुभाषचंद्र यांना होता.
तसाच विश्वास जर आपल्याला आपल्या नेतृत्व विषयी असेल, आणि त्यामुळे सामाजिक मोठा बदल घडवून येत असेल, तर नक्कीच आपले नाव इतिहासात अजरामर होण्यास जास्त वेळ लागत नाही.
सुभाषचंद्र यांचे धाडस आणि त्याग काही वेगळाच होता. वडिलांच्या सांगण्यावरून जेव्हा त्यांनी कलेक्टरची परीक्षा ८ महिन्यातच उत्तीर्ण करून ही देशाचे नेतृत्व करावे म्हणून ते काँग्रेस मध्ये शामिल झाले. जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली त्यावेळी सुभाषचंद्र बहुमताने निवडून आले. त्यानंतरही जेव्हा प्रांतीय निवडणूक झाली त्यामध्येही देशाचे नागरिकांनी सुभाषचंद्र यांना समर्थन दिले. यानंतर सुभासचंद्राचे निर्णय इंग्रजांप्रती आक्रमक होते. अनेक भारतीयांना गांधीजी पेक्षा सुभासचंद्र लवकर भारताला स्वातंत्र्य मिळवून देतील असा विश्वास होता.
पुढे गांधीजींशी मतभेद झाल्यावर आणि काँग्रेस मधून बाहेर पडल्यावर सुभासचंद्रा मधील नेतृत्व हा गुण शांत बसणार कोठे शिवरायांनी जसे औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून पसार झाले. तसेच सुभासचंद्र इंग्रजांच्या नजर कैदेतुन पसार झाले.
जर्मनीत गेल्यावर हिटलर कुठल्याही पद्धतीने मदत करणार नाही, दिसल्यावर सुभासचंद्र जपानला आले. सुभासचंद्र यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या महायुद्धातील जपानच्या कैदेतील 20 हजार भारतीय सैनिक आणि जपान मधील स्थानिक भारतीय मिळून सुभासचंद्रानी 45 हजारांची मोठी सेना उभी केली. हा सर्व सुभासचंद्र यांच्या नेतृत्वाचाच प्रभाव होता. यानंतर जी हिम्मत सुभासचंद्रानी दाखवली ती नक्कीच प्रशंसा लायक आहे. भारतातील बंगाल अंदमान निकोबार बेटे त्यांनी त्यावेळी स्वतंत्र केले होते. यानंतर जेव्हा सुभासचंद्रानी चलो दिल्ली चा नारा दिला त्यावेळी तर इंग्रजांना घामच फुटला.
मानले जाते की दुसरे विश्व युद्ध संपल्यावर आपलेच भारतीय सैनिक पुन्हा भारतात आल्यावर इंग्रजांकडून लढले नसते, तर भारत सुभासचंद्र यांच्याच हातून आझाद झाला असता.
त्याच बरोबर हे पण मानले जाते की, भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूंच्या जागी सुभासचंद्र झाले असते, तर आज भारत प्रगत देश असता. आणि हे सर्व फक्त सुभासचंद्रांच्या प्रभावी नेतृत्वामुळे झाले असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा