भारतीय स्वातंत्र्य विरांच्या (क्रांतिकारकांच्या) कथा
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक स्वातंत्र्य विरांपासून यशाचे काही धडे घेऊ शकतो -
1. आर्थिक संकट
अनेक क्रांतिकारक हे गरीब व आर्थिक टंचाईतलेच होते. घरामध्ये अनेक आर्थिक अडचणी ही होत्या, पण त्यांना आर्थिक श्रीमंती पेक्षा देशाचे स्वातंत्र्य महत्वाचे होते. मग त्यामध्ये लोकमान्य टिळक असतील चंद्रशेखर आझाद असतील भगतसिंग असेल किंवा सुभाषचंद्र बोस असतील, सुभाषचंद्रानि देशासाठी कलेक्टर पद सोडलं
यावरून महत्वाच्या गोष्टीसाठी कोणताही मोह सोडावा हे लक्ष्यात येते, तर अनेक आर्थिक अडचनीणा कसे सामोरे जावे हे आपण स्वातंत्र्य वीरांकडून शिकतो.
(तोरणा जिंकल्यावर शिवरायानं समोर अनेक आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले होते पण त्याच वेळी तोरणा किल्यावर सोन्याचे घडे सापडले )
2.कठीण परिथितील विजय
स्वातंत्र्य विरांसमोर अनेक संकट होती ठीक ठिकाणी इंग्रजचे गुप्तचर होते, त्यात भारतातलेच अनेक शिपाई होते, संदेश पाठवण्यास क्रांतीकारकांना अनेक अडचणनी आल्या पण तरीही त्यांचे काम मात्र चालूच होते .
आपल्याही समोर अनेक संकट असतात पण जिद्ध असेल तर त्याचाही सामना आपण करू शकतो .
3.अपूर्ण साधन सामग्री
स्वातंत्र्य विरांकडे अनेक साधन सामग्रीची अपूर्णता होती. हत्यारांची असेल किंवा माहितीची पण पण त्याही परिस्थितीत असेल तेवढ्याच साधना समवेत लढा दिला .
4.परिवारापेक्षा देशस्वातंत्र्य महत्वाच
अनेक क्रांतिकारकांनी देशासाढी परिवाराचा त्याग केला, मग ते भगतसिंग असतील किंवा सुभाषचंद्र अश्या अनेक वीरांनी देशा पुढे आयुष्यातील अनेक गोष्टी छोट्या मानल्या .
आज जर भारतसीमेवर आपल्यामधील अनेक विर जवान परिवाराचा विचार न करता सीमेवर लढण्यास सज्ज असतात .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा