प्रत्येक शतकात इतिहास एका न एका वीरांच्या किर्तीने अलंकृत होत असतो, तानाजी मालुसरे यांनी इतिहासाला आपल्या गौरव गाथेने जसे अलंकृतच केले होते.
तानाजी यांचा जन्म १६२६ मध्ये सातारा जिल्ह्यातील गोंडावली या गावी झाला. वडील कलोजी आणि आई पार्वतीबाई यांचे ते जेष्ठ पुत्र.
तानाजी मालुसरे यांचे वडील कुस्ती पट्टू होते. त्याच बरोबर ते प्रसिद्ध तलवारबाज ही होते वाडीलाप्रमाणेच तानाजींना युद्ध कौशल्याची आवड लहानपणापासूनच होती.
पुढे वडिलांच्या मृत्यू नंतर तानाजी आपला धाकटा भाऊ येसाजी याच्या बरोबर आपल्या मामाच्या म्हणजेच शेलार मामाच्या गावी उंबरठ या गावी स्थायिक झाले.
बालपणापासून तानाजींनी घरातील सर्व जवाबदारी पार पाडत असतानाच ते पुढे स्वराज्याच्या सेनेत शिवरायांच्या सोबत उभे राहिले.
जवाबदारीच्या बाबतीत जेव्हा सिंह गड सर करण्याची गोष्ट आल्यावर तान्हा आपली जबाबदारी विसरले नाहीत.
आणि आजच्या कालावधीत युवक फक्त आर्मी मध्ये जाऊनच देशाच्या सेवेला जवाबदारी मानतो, आर्मी बरोबरच देशाच्या आत ही देशाच्या सेवेच्या अनेक जवाबदाऱ्या असतात, हे तो विसरतो.
क्रमशः......
Akash Bhau khup chan -abhishekpawar
उत्तर द्याहटवा