शिवरायांचे निस्वार्थी मित्र परिवार
जीवनात जर मोठे कार्य सम्पन करायचे असेल तर आपल्याला निस्वार्थी आणि त्यागी मित्र बनवणे गरजेचे आहे. संकटाच्या प्रत्येक पावलावर साथ देणारे मित्र मिळवणे गरजेचे आहे. शिवरायांनी बारा मावळातून अनेक मित्र मिळवले ,आणि शिवरायांचा मित्र परिवार स्वराज्याच्या संकट काळात शिवरायांसाठी मर मिटायला ही तयार होता. स्वराज्या साठी शिवरायांनी कसे मित्र निवडले ते पुढील मुद्यांवरून लक्षातच येईल.
योग्य मित्राची निवड
शिवरायांच्या मित्र परिवारात जर पाहिले तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा हिंदू मुस्लिम जातीचा भेदभाव केलेला आढळत नाही.फक्त मातृभूमी साठी ज्यांच्या मनात तीव्र इच्छा आहे जे स्वतःच्या प्रणापेक्षा स्वराज्यासाठी बलिदान देण्यास तयार होते असा सर्व मित्र परिवारा कडे शिवराय आकर्षित होताना दिसून येतात . कारण शिवरायांनचे विचारही त्याच प्रकारचे होते, एक प्रकारे शिवरायांनी वर्ण धर्म यांच्या पेक्षा विचार धारेला महत्व दिले म्हणजेच बाय्य गुना पेक्षा आंतरिक गुणांना महत्त्व दिले .
स्वराज्यासाठी मित्रांची योग्य ठिकाणी नेमणूक
शिवराय स्वराज्यासाठी प्रत्येक आपल्या मित्रांची योग्य ठिकाणी नेमणूक करताना त्यांच्या विचार धारेवरून विविध ठिकाणी नेमणूक करत जसे वीर तानाजी ,येसाजी ,जिवाजी हे बलिष्ठ आणि युद्धात निपुर्ण होते, त्यामुळे प्रत्येक युद्धाच्या अग्रभागी या मित्रांचा समावेश असत. अफजलखानाच्या वेळी होता जीवा म्हणून वाचला शिवा अस आपण म्हणतो, तर चतुर आणि चपळ मित्रांना गुप्त हेर म्हणून नेमणूक केली,आग्र्याच्या सुटकेच्या वेळी माधारी मेहतरच सर्वात जास्त गुप्त बातम्या आणत होता.
त्याच बरोबर लबाड व स्वहितासाठी, जहागिरीसाठी लढणाऱ्या सोबत्याना शिवरायांनी दोन हात दूर म्हणजेच दोनचार गावांचा सुभेदार म्हणून नेमणूक करत अफजलखानाच्या वेळी जेधे, बांधलं, घोरपडे यानासरखेच सर्वात पाहिल्यानंदा खानाला जाऊन मिळाले.शिवरायांच्या इतिहासात कधी मित्रावर संशय केला, किंवा जवळील मित्राने दगा केला, असे उदाहरण आढळत नाही .
त्यामुळेच फक्त फायदा काढून घेणारे पैसे जवळ असताना पुढे पुढे करणारे मित्र करण्या पेक्षा संगतीने नवा करोबार टाकू सोबत देशाच्या विकासात हातभार लावू असे मित्र बनवणे गरजेचे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा