शिवरायांचे बालपणीचे शिक्षण
शिवराय हे छत्रपती झाले असतील तर त्या मागे त्यांच्या प्रशिक्षणाचा नक्किच मोठा वाटा आहे हे पुढील काही मुद्यांवरून आढळून येते-
प्रात्यक्षित पद्धतीचे शिक्षण (Practical knowledge)
शिवरायांच्या कालावधीत शिक्षण हे मुख्य करून प्रात्यक्षिक पध्दतीचे होते. असे आढळून येते या कालावधीतील विद्यार्थ्यांना युद्ध कला जसे तालावरबाजी, दांडपट्टा, घोड्यावर रपेट मारणे अशा विविध कला शिकवल्या जात.
आजच्या कालावधीत प्रात्यक्षित पद्धतीचे शिक्षण खुप कमी दिसून येते. १ तासाच्या आत शिकवलेला विषय जीवनात कोठे उपयोगी पडू शकतो हे काही वेळा शिक्षक सांगत नाही, तर विद्यार्थी ही समजून घेत नाही शिवाय पाण्यात पडल्या शिवाय पोहता कसे काय येईल .
संघ व वयक्तिक पद्धतीचे शिक्षण
संघ पद्धतीने म्हणजे एकत्र जसे शिवरायांचे शिक्षक गुरू दादाजी कोंडदेव हे शिवरायांना त्याच बरोबर मावळ्यांना आणि शिवरायांच्या सवंगड्याना एक सोबत व वयक्तिक शिक्षण देत असे पण त्यांच्या शिस्तीत मात्र थोडा सुद्धा भेदभाव नसे.
आजच्या कालावधीत जर पाहिले तर दोन्ही पद्धतीचे शिक्षण मिळते वयक्तिक पध्दतीचे शिक्षण शक्यतो शहरातच आढळून येते. यात शिक्षक समान शिस्त ठेवतीलच असे नाही .त्याच बरोबर विद्यार्थीही शिक्षकांचा किती आदर ठेवतात, त्याच्यावरही प्रश्न उभा राहिला आहे.
आई जिजाऊंचे शिवरायांना प्रशिक्षण
जिजामाता स्वतः शिवरायांना तालावर बाजी पासून ते ज्ञानेश्वरी , रामायण पठण पर्यंत प्रशिक्षण देत होत्या. आपल्या स्वतःच्या मुला समोर त्या एका शिस्त बद्ध गुरू प्रमाणे उभ्या राहत. गनिमी काव्याचे अनेक धडे शिवरायांनी जिजाऊनकडूनच घेतले.
आजच्या कालावधी जर पाहिले तर ग्रामीण भागाततही TV, मोबाईल आल्यामुळे बहुतेक माता आता आपल्या बालकाकडे लक्ष देत नाहीये ,असे आढळून येते.
निसर्ग हा एक शिवरायांचा गुरू
शिवराय स्वतःहून नवीन काही शिकण्यात रस घेत. किल्यांवर मंदिरामध्ये सवंगड्यासह फिरत निसर्गातून जीवनातील अनेक धडे शिकत. ज्याचा फायदा शिवरायांना अफजलखान वध, शाहिस्तेखान फजिती असा अनेक ठिकाणी झाला.
पुस्तकातील व शिक्षकांनी दिलेले ज्ञान हे त्या गोष्टीचा अर्धा भाग असतो. आपल्या नवीन अनुभवांनी व विचारांनी ते ज्ञान पूर्ण होत असते .
आजच्या कालावधीत विद्यार्थी घेणारे शिक्षण समजून घेत नाही. त्यामुळे degree तर मिळते पण व्यवसाय काय नोकरीही मिळण्याचे कठीण होते.
शिवरायांचे सिद्धांतिक (theoretical) ज्ञान
शिवरायांना विविध ७ ते ८ भाषेंचे ज्ञान होते त्यांनी अनेक ग्रंथ ही वाचले संस्कृत उर्दू तमिळ अष्या अनेक भाषा शिवरायांना अवगत होत्या संस्कृतातील अनेक कठीण श्लोक त्यांना कंठस्त होत्या.
पण आजच्या कालावधी सिद्धांतिक( theoretical) ज्ञानाला विद्यार्थी कमी महत्व देतो त्याला कंटाळवाणे मानतो शिक्षण तर घेतले जाते पण ते फक्त परीक्षा पुरते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा