कोणाच्याही आयुष्यात यश येण्यासाठी महत्वाची असते ती जिद्द चिकाटी आणि कष्ट पण काही वेळा असे प्रसंग तयार होतात, की त्यावेळी नशिबाची किंवा भगवंत आशीर्वादा ची गरज असते. खर तर भगवंत चांगले कर्म करणाऱ्यांच्या पाठीशी उभाच असतो .
शिवरायही जुलुमी आदिलशाही विरुद्ध जेव्हा युद्ध पुकारले तेव्हा सुरुवातीला च अनेक संकटे आली ,त्यातील एक होते ते आर्थिक पाठबळ नसल्याचे संकट. शिवरायांनी जेव्हा तोरणा किल्ला जिंखला, त्यावेळी तोरणा किल्याचे बांधकाम करताना शिवरायांना आर्थिक टंचाई जाणवली. त्यांचे मन निराश झाले ,त्यांना विचार येऊ लगले की पुढील माहिम किल्याचे कामे सेनेचे पगार असे अनेक चिंता जाणवू लागल्या ,पण जिजाऊंनी त्यांना धिर दिला व म्हणाल्या की आई भवानी सर्व ठीक करील, आणि तेच बोल खरे ठरले तोरणा किल्याचे बांधकाम कसेबसे चालू होते खोदकाम करताना खजिना सापडला शिवरायांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी पुढील महिमेकडे लक्ष केंद्रित केले.
मग आता प्रश्न हा उभा राहतो ,की शिवरायांनी नशिबावर विश्वास ठेवला की देवावर की स्वतःच्या कार्यावर . तर तर्क लावून पाहिल्यावर माझ्या मते शिवरायांनी स्वतःच्या हातून जितके कर्तृत्व होतील त्यावर विश्वास ठेवला असेल जे भगवंताच्या हातात असेल ते त्यांनी भगवंतावर सोडले असेल.
म्हणून नशिबावर टिकून राहण्या पेक्षा कर्तृत्वावर टिकून राहणे महत्वाचे आहे,शिवराय स्वराज्यासाठी लढत होते त्यामुळेच भवानी आई त्यांच्यावर प्रसन्न झाली असेल.
यावरून एक नक्कीच सिद्ध होते की-
चांगले कार्य करत असाल आणि मार्गामध्ये मोठी संकटे आली असल्यावर ती जर आपल्या क्षमते च्या परे असतील तर ती भगवंतावर सोडून आपल्याकडून जितके होईल तेवढे तरी करत राहणे गरजेचे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा