जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
शिवराय आणि संभाजीराजे यांच्या जन्म कालावधी पासून जर पाहिले तर संकटंचा आणि दुःखाचा च होता. असे दिसून येते प्रथम शिवरायांचे जर पाहिले तर त्यांच्या जन्माच्या वेळी जिजाऊंच्या सासर आणि माहेर यामध्ये संघर्ष सुरू झाला होता. या संघर्षा मध्ये त्यांचे अनेक आप्तजन मारले गेले होते . आणि त्याच कालावधीत शहाजी राजांनी आदिलशाहीशी बंडावा केला आणि त्या युध्दात शहाजी राजे हरले गेले. आणि आदिलशाहीतील आपलेच काही मराठे सरदार जे शहाजी राजांवर जळत होते त्यांनी शहाजीराजांच्या जवळील सरदारांना फितवण्यास सुरुवात केली त्यामुळे गर्भवती जिजाऊंना आपल्या कोणत्या विश्वासु सरदारांवराकडे देखभाल करण्याआधी ढेवावे हे कळेना त्या नंतर आपला सर्वात जवळचा मित्र विश्वासराव जे शिवनेरी किल्याचे सरदार होते( शेवटी तोही पर मुलुख) पण विश्वास रावांनी मात्र आपल्या भगिनी प्रमाणे जिजाऊंना सांभाळले.( संकटाच्या काळात जो मित्र कामी येतो तोच खरा मित्र).
मित्रांनो फक्त जन्माच्या कालावधीतच नाही तर त्यानंतर बाल्य अवस्थेततही वीरांन पुणे शिवरायांना करोभारासाठी मिळाले पण त्याही अवस्थेत त्यांनी यश मिळवले अशी अनेक संकटे आली होती.
यावरून फक्त एकच गोष्ट सिद्ध होते की ज्यांच्या आयुष्यात संकटांचा भडिमार असतो ,त्या व्यक्तींचे जीवन जसे संघर्षानीच भरलेले असते पण जो या संकटांचा सामना करतो तोच प्रसिद्ध होतो.
शिवराया प्रमाणेच संभाजी राज्यांचे जन्म कालावधी संघर्षानी भरलेला होता आपल्याही आयुष्यात अशा संघर्षा च्या प्रारस्थिती येत असतील तर त्याचा योग्य प्रकारे सामना करा काय भरवसा तुम्हीही शिवरयाप्रमाणे काही वेगळे करून जाल.
(संभाजी महाराजांच्या ही जन्म कालावधीत संकटे होती तो भाग आपण पुढील पोस्ट मध्ये पाहू)
क्रमशः....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा