मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिवराय समभाजींच्या जन्मापासून संकटाची वर्दळ भाग 2


          या आधीच्या भागात आपण शिवरायांच्या जन्मकाळावधी पासून संकटांची वर्दळ पहिली, या भागात आपण संभाजी महाराजांच्या ही जन्म कालावधी पासून संकटांची वर्दळ होती ,ती पुढील मुद्यांवरून पाहू-

१. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर या किल्यावर झाला. आणि स्वराज्याला छावा मिळाला. पण वीरांच्या आयुष्यात जन्मापासूनच संकटे जशी त्यांची परीक्षाच पाहतात.
   २. सर्वात मोठं संकट म्हणजेच अफजलखान ज्यावेळी शिवरायांवर चालून आला त्याच वेळी संभाजी राजे नुकतेच ४ महिन्यांचे झाले होते, आणि याच कालावधीत अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला होता, आणि शिवरायांचा मुलुख बेचराख करत चालला होता .
          आणि सँभाजी महाराजांचे मामा बजाजी निंबाळकर हे अफजलखानाच्या कैदेत अडकले होते.
      ३ .आणि त्याच कालावधीत सँभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई या आजारी होत्या. त्यामुळे संभाजी राजेंना पुरेसे दूध भेटत नव्हते, त्यामुळे त्यांच्यासाठी दाईची व्यवस्था करण्यात आली होती.
       ४. आणि याच कालावधीत सँभाजी राजेंच्या मातोश्रीच निधन झाले, यानंतर आईची जागा जिजाऊंनी भरून काढली.
        ५. सँभाजी राजे भविष्यातील युवराज होते, त्यांच्याच जवळील आप्तजन त्यांच्यावर जळफळ करायचे ,त्यामुळे त्यांचे बालवयापासूनच अनेक शत्रू निर्माण झाले होते.
६ .बालवयापासून संभाजी महाराजांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले मग ते आग्रा भेट असो वा मुघलांना जाऊन भेटले असा दुसप्रचार असो पण या सर्व संकटांमध्ये सँभाजी महाराजांनी आपला संयम कायम ठेवला.

आणि एवढे संकटे झेलल्या नंतरही छञपती संभाजी राजांनी मुघलांचा सामना केला.
      सँभाजी राजेही इतिहासातील एक प्रेरक व्यक्तिमत्व होऊन गेले आहे. ज्यांच्या जन्म कालावधी पासून  नियती आणि सँभाजी राजाचे कर्म स्वराज्यासाठी बहाल होते म्हणूनच ते एक प्रेरक व्यक्तिमहत्व आहे.


भाग १ वाचण्यासाठी येते क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...