प्रत्येक युगात कोणत्या न कोणत्या दानवांचा अत्याचार वाढला, किंवा मनुष्य जातीवर अन्याय झाल्यावर कोणीतरी दैवी शक्ती जन्म घेते हे खरेच म्हणावे लागेल.
सत युगात रावणाचा अत्याचार वाढल्यावर राम आणि द्वापार युगात धर्म संकटात आल्यावर श्रीकृष्णा चा जन्म झाला.
प्रत्येक युगात जसे वाईट वृत्तीचे मनुष्य जन्माला आले ,आणि त्यांच्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच दैवी पुरुष ही जन्माला आले.
ज्या वेळी महाराष्ट्रा वरच नव्हे तर संपूर्ण भारतावर मुघल शासन करताना हिंदूंवर अत्याचार करत होते, आणि हा अन्याय अत्याचार पाहून जिजाऊ ना मात्र दुःख होत होते ,म्हणजेच ही एक चाहूल होती. अनामिक घडण्याची सामान्य जनातेवरील अन्याय दूर करण्यासाठी सुद्धा कोणा वीर पुरुषाला धरतीवर पाठवण्याची ही एक चाहूलच असेल.
गर्भवती जिजाऊंना सुद्धा तुळजा मातेकडे कोणी विर पुरुषच जन्माला यावा अशी याचना मातेकडे करत असेल, आणि अभिमन्यू ने जसे आपल्या आईच्या गर्भात असतानाच चक्राविव भेदण्याचे समजून घेतले होते तसेच शिवरायांनी भविष्यात हिंदूंवर भारत भूमीवर अत्याचार करणाऱ्यांचा परिपात करण्याचे शिवरायांनी जसे ठाणलेच होते.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला म्हणून नाव शिवाजी ठेवण्यात आले.
इतिहासातील काही उदाहरणावरून शिवराय जन्मताच दैवी पुरुष आहे. असे मी दर्शवण्याचा प्रयत्न केला किंवा आपण सर्व मानतो, पण त्या पेक्षा शिवराय जन्मताच एक सामान्य मनुष्य म्हणून जन्माला आले आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर ते एक दैवी पुरुष झाले. तसेही आपल्या संतांनीही सांगितले च आहे की कर्तृत्वाच्या बळे किंवा भक्तीच्या बळे आम्ही झालो देव.
आपण साधारण मनुष्य शिवरायांचा आदर्श ठेऊन समाज हितासाठी नक्कीच कार्य करू, नाहीतर शिवराय जन्मताच दैवी पुरुष आणि आपण तर सामान्य मनुष्य असे म्हटल्यावर आपण काहीही करणार नाही
पण ज्या दिवशी मीही शिवरयासारखे कर्तृत्व करू शकतो असे ठरवल्यावर फुल नाही पण फुलाची पाकळी एवढे कर्तृत्व शिवरायांचा आदर्श ठेऊन नक्कीच करू.
हो की नाही कमेंट करून नक्की सांगा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा