आपल्या स्वतःवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध जो आवाज उठवून त्या अन्यायाला मोडून काढतो ,त्याला आपण वीर मानतो. पण दुसऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठतो, त्याला तर आपण महावीरच म्हटले हवे .
' उदाहरणार्थ जिजाऊ महासाहेब'. जेव्हा पूर्ण भारतावर मुघल, निजाम जेव्हा हिंदूंवर अन्याय अत्याचार करत होते .त्याच वेळी महाराष्ट्राचा काही भाग असा ही होता, जेथे हिंदूं सुरक्षित होते .त्यापैकीच ऐका ठिकाणचे महाराज लखुजीराव जाधव. लखुजीराव निजामाचे सरदार होते .पण इतर प्रदेशामध्ये जो अन्याय चालला होता, तो त्यांनी सिंदखेड मध्ये त्यांनी प्रजेला सुखात ठेवले होते, आणि याच वातावरणात जिजाऊंचा जन्म झाला.
लहानपणापासूनच जिजाऊ हुशार होत्या, त्यांनी खुप लवकर राजकारणात लक्ष दिले होते. वडील सरदार असल्यामुळे जिजाऊंना लहानपणापासूनच घोड्यावर बसने, तालावर चालवणे यांचे प्रशिक्षण मिळाले, शिवाय जिजाऊ घर कामातही चपळ होत्या .
जिजाऊ महासाहेब जेव्हा वडीला बरोबर निजामांच्या प्रदेशात जात तेव्हा तेथील प्रजेवरील अन्याय पाहून मात्र जिजाऊंना अत्यंत दुःख होत.
खरे तर दुसऱ्या विषयी आपुलकी वाटून त्याच्यावरील अन्याय दूर करणाऱ्यालाच आपण महावीर मानतो . नाहीतर आजचे नेते,आणि युवक दुसऱ्यांचे हित करण्याचे फक्त ढोंग करतात ,प्रचाराच्या वेळी आणि सोसियल मीडियावर हे दिसूनच येते.
आणि यामुळेच स्वराज्याचे पाहिले उगमस्थान अन्याया विरुद्ध उभे ठाकले ,स्वराज म्हणजे आपल्या सर्वांचे राज्य मायमाऊलींचे रक्षण ,शेतकऱ्यांचे हित अशा राज्याचे खरे स्वप्न जिजाऊनीच पहिल्यांदा पाहिले होते, जिजाऊंचे स्वप्न जर बीज आहे ,तर शिवराय त्यातील झाड आहे.
शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी त्यामुळे खरे पाहिले तर जिजाउमहासाहेबच स्वराज्याच्या पहिल्या उगमस्थान आहे.
जर आपण थोडे आजच्या कालावधीत बघितले, तर मायमाऊल्यानी आपल्या मुला, मुलींना TV वरील प्रेमाच्या मालिका आणि मोबाईल वरील रिकामी चॅटिंग करू देण्या पेक्षा जिजाऊंचा इतिहास वाचून दाखवला तर त्या नक्कीच जिजाऊसारख्या रणांगणा होतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा