कोणतेही पद आपल्याला प्राप्त करायचे असेल , किंवा मिळत असेल तर त्यासाठी आपली क्षमता दाखवने खुप गरजेचे असते. आपण इतिहासातील अनेक उदाहरणे पाहिले तर राजाने आपली सत्ता आपल्या पुत्रा कडे कोणती ही क्षमता न बघता सोपवली असे आढळून येते. पण संभाजी महाराजांच्या बाबद हे उलट आदळून येते, ज्यावेळी शिवरायांचे देहांत झाले, त्यावेळी संभाजी महाराज मुघलांच्या तावडीतुन सुटून नेटकेच आले होते. परंपरा आणि क्षमते नुसार संभाजी महाराजांचा छत्रपती पदावर अधिकार होता. पण संभाजी महाराजांच्या सावत्र आई सोयराबाईना आपला पुत्र राजाराम महाराज यांना सत्तेवर बसवायचे होते. म्हणजेच संभाजी महाराजांना माघे मुघल तर समोर स्वतःची आई असे शत्रू होऊन बसले होते.(आणि औरंगजेबाला ही संभाजी महाराज छत्रपती होऊ नये असे वाटत होते.)
यामुळेच सोयराबाईनी स्वतःचे सख्खे भाऊ आणि स्वराज्याचे सेनापती हंबीराव मोहिते यांना संभाजी महाराजांना अटक करण्याचा आदेश दिला. पण जेव्हा हंबीरराव संभाजी महाराजा कडे पोहोचले त्यावेळी त्यांनी आपली तलवार संभाजी महाराजांच्या समोर ठेवली म्हणजेच हंबीररावानी स्वराज्याचे छत्रपती आपल्या सख्या भाच्या पेक्षा संभाजी महाराजांना मानले यामधून दोन गोष्टी नक्की स्पष्ट होतात पहिली म्हणजे हंबीरावांचा कार्याप्रति प्रामाणिकपणा आणि संभाजी महाराजांची क्षमता, कारण हंबीररावांना माहीत होते की मुघलांशी लढा शिवरायानंतर संभाजी महाराजच देऊ शकतील.
संभाजी महाराज जेव्हा रायगडावर आल्यावर काही कालावधीसाठी त्यांनी सोयराबाईंना त्यांच्याच कक्षात बंदी बनवले. पण नंतर मात्र मुक्त करून त्यांना राजमाता या पदावरही आरूढ केले. राजाराम महाराजाना तर संभाजी महाराज सख्खा भावा प्रमाणे वागवत. (एवढं होऊन सुद्धा)
संभाजी महाराजांवर अष्ट मंडळाचा ही विश्वास होता. संभाजी महाराज राजकारभरात तरबेज होते, अनेक भाषा ते जाणत होते युद्ध कौशल्य, अर्थशास्त्र, नीती शास्त्र शिवाय संस्कृत भाषेत त्यांनी अनेक श्लोक ही लिहिले आहे.
संभाजी महाराजांची छत्रपती या पदासाठी अजिबात हवस नव्हती, पण शिवरायांनी उभे केलेल्या स्वराज्याचे रक्षण करणे गरजेचे होते, म्हणून दूर दृष्टीकोन ठेऊनच ते आपल्या सावत्र आई च्या विरोधात गेले.
या ठिकाणी संभाजी महाराजाच्या छत्रपती पदासाठी प्राथमिक क्षमता बघितली, तर स्वराज्यातील अनेक सरदार अधिकाऱ्यांचा विश्वास संभाजी महाराजांवर होता. आणि बाकीच्या क्षमता तर त्यांनी मुघलांशी सामना करताना तब्बल नऊ वर्ष दाखवलेच .
याच गोष्टीला आजच्या काळात पाहिले तर वडील आपल्या बेजबाबदार मुलाला क्षमता न भागताच संपत्ती देऊन टाकतात आणि कनिष्ठ अधीकारी आपल्या फायद्यासाठी पुढेपुढे करता राजकारणातील नेत्यांमध्ये हे मुख्यत्वे आढळून येते या सर्वांनी संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी त्यांच्या कडून काही शिकावे अशी अपेक्षा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा