जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदेवत खंडेराया यांना संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आदराने पुजले जाते. गोंधळाचा पहिला मान खंडेरायलाच ,पण आपण खंडेरायाला डीवट्या पूजन गोंधळ या वितिरिक्त कधी समजूनच घेतले नाही. खंडेराया हे एक जागृत देवस्थान आहे .खंडेरायाच्या भक्ती बरोबरच खंडेरायकडून खुप काही शिकण्यासारखे ही आहे.
माणिचुर पर्वतावर सप्तर्षी तप करत होते. पण याच वेळी मल्ल नावाचा राक्षस त्या सप्तर्षीना त्रास देत होता .ब्रम्हाकडून अमरत्व सारखं वरदान प्राप्त झाले होते. त्यामुळे भक्तांच्या रक्षणासाठी शिवशंकराने खंडेरायाच्या अवतार घेतला .
भक्तांचे तारण करण्यास व दृष्टा चा संहार करण्यास देव अवतार घेत असतो, रावणाचा अत्याचार वाढल्यावर राम आले धर्म भ्रष्ट झाल्यावर श्री कृष्ण आले. तर मुघलांचा अत्याचार वाढल्यावर शिवराय आले, गरज आहे या काळात अशाच वीरांची .
मल्लाचा पराभव केल्या नंतर मरताना मल्ल राक्षसाने माझे नाव आपल्यात घ्यावे अशी विनंती केल्यावर खंडेराया मल्हारी या नावाने सुद्धा ओळखला जाऊ लागले .(खंडांग+ राव राजा खंडांगाचा राजा असा हा खंडेराव )
शत्रूला माफ करतो तो एक वीर माणूस तर शत्रूचे ही नाव स्वतःत घेतो त्याला तर देवच म्हटले जाते .खरे पाहिले तर दृष्ट गुण विरोधकात असतात तोपर्यंत तो आपला शत्रू पण दृष्ट गुण संपल्यावर तो आपला सोबतीच होतो .पण अस ओळखणारा एक देवच असतो.
मुळातच मल्ला चा वध हा पती पत्नीच्या हातून होईल असा वर होता त्या मुळे नियती नुसार खंडेरायाने देवी भानई शी लग्न करून मल्लाचा वध केला. भानई मागील जन्मातील गंगा होती.पती रुपी महादेव मिळावे असा वर तिने मागितला होता .आणि खंडेरायाच्या तो ही वर पूर्ण केला.
तसे पाहिलेतर खंडेरायाच्या हा अवतार पूर्ण पणे समृद्ध आहे .शिकण्या सारखे खुप आहे. देवी म्हाळसेचा खंडेरायाला शाप देवी म्हाळसेचा बाणाई वरील राग या गोष्टी संसारी माणसाला खूप काही शिकवतात मी माझ्या अल्प बुद्धीने होईल तेवढे मंडण्या पर्यंत केला .येणाऱ्या पुढील भागात होईल तेवढी माहिती मांडण्याचा नक्की पर्यंत करील .
आजचा भाग आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा