गणपती बाप्पा चा चातुर्य हा एक गुण
गणपती बाप्पा ही ज्ञानाची, बुद्धीची,शक्तीची, व आरोग्याची देवता आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे आपण गणरायकडून अनेक गुण घेऊ शकतो.चातुर्य हा त्या पैकी एक .तो गुण पुढील काही उदाहरणावरून लक्षातच येईल.
पुराणात अनेक कथा गणरायाच्या बुद्धीचे व चतुर्याचे वर्णन करतात -
ती एक कथा तर सर्वानाच माहीत असेल, ज्यावेळी गणरायावर जेव्हा साडेसाती म्हणजेच शनी ग्रह लागणार होता. त्यावेळी शनी देव गणरायाकडे निघाले.ही गोष्ट जेव्हा गणरायाला कळाली तेव्हा गणरायाने एक युक्ती लढवली, व शनी देव ज्या मार्गाने येत होता त्या मार्गावर जिते तिथ लिहून ठेवले की "उद्या या" .गणपती हे देवाचे प्रमुख असल्याने त्यांच्या या विनंतीला शनिदेव मान देत दुसऱ्या दिवशी आले. पण दुसऱ्याची दिवशी तसेच लिहिले असल्याने त्यांना परत जावे लागले. शनी देव जेव्हा गणरायकडे येतात त्यावेळी त्यांना हेच वाचण्यास मिळते. त्यामुळे सर्व देवांमध्ये फक्त गणपती (व हनुमान )यांना शनिग्रह लागत नाही .
गणरायाच्या बुद्धी चातुर्यामुळे शनि देव गणरायपर्यंत कधीच पोहोचलेच नाही .म्हणून गणरायाची प्रथम पूजा केली जाण्याचे एक कारणच आहे .
या पौराणिक कथे वरून गणरायाच्या बुद्धीचे व चतुर्याचे महत्व कळून येते. शनी सर्वांवर हावी होतो ,पूर्ण रामा पर्यंत पण गणरायावर नाही.
यावरून संकट कितीही मोठे असले तरी निट विचार करून निर्णय घेतला तर मार्ग नक्कीच सापडतो, फक्त आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे .म्हणून गणरायाची भक्ती केल्यावर जर आपल्यावर संकट आले तर योग्य वेळी गणराया धाऊन येतो व योग्य विचार व निर्णय घेण्याची शक्ती देतो. हे या कथे वरून लक्षात येते.
क्रमशः.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा