मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

सुभाषचंद्र बोस यांच्यातील नेतृत्व हा मोलाचा गुण

        सामाजिक कोणत्याही गोष्टीचे नेतृत्व करायचे असेल, तर त्यासाठी धेंर्य लागते. नेतृत्व करणाऱ्या गोष्टी विषयी माहिती नसताना जर आपण आव आणून नेतृत्व केले, तर मोठी सामाजिक हानी होण्याची शक्यता असते. वस्तूत काही गुण माणसाला जन्मतःच असतात, त्यापैकीच सुभाषचंद्र यांच्यात नेतृत्व हा गुण आढळून येतो.इंग्रज गुलामगिरीच्या काळात आपल्या देशाचे नेतृत्व करून आपण आपल्या देशाला स्वतंत्र करू शकतो असा विश्वास सुभाषचंद्र यांना होता.        तसाच विश्वास जर आपल्याला आपल्या नेतृत्व विषयी असेल, आणि त्यामुळे सामाजिक मोठा बदल घडवून येत असेल, तर नक्कीच आपले नाव इतिहासात अजरामर होण्यास जास्त वेळ लागत नाही.       सुभाषचंद्र यांचे धाडस आणि त्याग काही वेगळाच होता. वडिलांच्या सांगण्यावरून जेव्हा त्यांनी कलेक्टरची परीक्षा ८ महिन्यातच उत्तीर्ण करून ही देशाचे नेतृत्व करावे म्हणून ते काँग्रेस मध्ये शामिल झाले. जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली त्यावेळी सुभाषचंद्र बहुमताने निवडून आले. त्यानंतरही जेव्हा प्रांतीय निवडणूक झाली त्यामध्येही देशाचे नागरिकांनी...

एवढया संकटां नंतर झाला होता संभाजी महाराजांचा राज्यभिषेक

        कोणतेही पद आपल्याला प्राप्त करायचे असेल , किंवा मिळत असेल तर त्यासाठी आपली क्षमता दाखवने खुप गरजेचे असते. आपण इतिहासातील अनेक उदाहरणे पाहिले तर राजाने आपली सत्ता आपल्या पुत्रा कडे कोणती ही क्षमता न बघता सोपवली असे आढळून येते. पण संभाजी महाराजांच्या बाबद हे उलट आदळून येते, ज्यावेळी शिवरायांचे देहांत झाले, त्यावेळी संभाजी महाराज मुघलांच्या तावडीतुन सुटून नेटकेच आले होते. परंपरा आणि क्षमते नुसार संभाजी महाराजांचा छत्रपती पदावर अधिकार होता. पण संभाजी महाराजांच्या सावत्र आई सोयराबाईना आपला पुत्र राजाराम महाराज यांना सत्तेवर बसवायचे होते. म्हणजेच संभाजी महाराजांना माघे मुघल तर समोर स्वतःची आई असे शत्रू होऊन बसले होते .(आणि औरंगजेबाला ही संभाजी महाराज छत्रपती होऊ नये असे वाटत होते.)       यामुळेच सोयराबाईनी स्वतःचे सख्खे भाऊ आणि स्वराज्याचे सेनापती हंबीराव मोहिते यांना संभाजी महाराजांना अटक करण्याचा आदेश दिला. पण जेव्हा हंबीरराव संभाजी महाराजा कडे पोहोचले त्यावेळी त्यांनी आपली तलवार संभाजी महाराजांच्या समोर ठेवली म्हणजेच हंबीररावानी स्वराज्याचे छत्रपत...

जिजाऊ महासाहेब स्वराज्याच्या पहिल्या उगमस्थान का ? यामागील पाश्वभूमी

        आपल्या स्वतःवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध जो आवाज उठवून त्या अन्यायाला मोडून काढतो ,त्याला आपण वीर मानतो. पण दुसऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठतो, त्याला तर आपण महावीरच म्हटले हवे .     ' उदाहरणार्थ जिजाऊ महासाहेब'. जेव्हा पूर्ण भारतावर मुघल, निजाम जेव्हा हिंदूंवर  अन्याय अत्याचार करत होते .त्याच वेळी महाराष्ट्राचा काही भाग असा ही होता, जेथे हिंदूं सुरक्षित होते .त्यापैकीच ऐका ठिकाणचे महाराज लखुजीराव जाधव. लखुजीराव  निजामाचे सरदार होते .पण इतर प्रदेशामध्ये जो अन्याय चालला होता, तो त्यांनी सिंदखेड मध्ये त्यांनी प्रजेला सुखात ठेवले होते, आणि याच वातावरणात जिजाऊंचा जन्म झाला.      लहानपणापासूनच जिजाऊ हुशार होत्या, त्यांनी खुप लवकर राजकारणात लक्ष दिले होते. वडील सरदार असल्यामुळे जिजाऊंना लहानपणापासूनच घोड्यावर बसने, तालावर चालवणे यांचे प्रशिक्षण मिळाले, शिवाय जिजाऊ घर कामातही चपळ होत्या .     जिजाऊ महासाहेब जेव्हा वडीला बरोबर निजामांच्या प्रदेशात जात तेव्हा तेथील प्रजेवरील अन्याय पाहून मात्र जिजाऊंना अत्यंत दुः...

चंपाषष्ठीला घ्या खंडेरायकडून हे मौल्यवान गुण

          संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदेवत खंडेराया यांना संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आदराने पुजले जाते. गोंधळाचा पहिला       मान खंडेरायलाच ,पण आपण खंडेरायाला डीवट्या पूजन गोंधळ या वितिरिक्त कधी समजूनच घेतले नाही.               खंडेराया हे एक जागृत देवस्थान आहे .खंडेरायाच्या भक्ती बरोबरच खंडेरायकडून खुप काही शिकण्यासारखे ही आहे.  माणिचुर पर्वतावर सप्तर्षी तप करत होते. पण याच वेळी मल्ल नावाचा राक्षस त्या सप्तर्षीना त्रास देत होता .ब्रम्हाकडून अमरत्व सारखं वरदान प्राप्त झाले होते. त्यामुळे भक्तांच्या रक्षणासाठी शिवशंकराने खंडेरायाच्या अवतार घेतला .      भक्तांचे तारण करण्यास व दृष्टा चा संहार करण्यास देव अवतार घेत असतो, रावणाचा अत्याचार वाढल्यावर राम आले धर्म भ्रष्ट झाल्यावर श्री कृष्ण आले. तर मुघलांचा अत्याचार वाढल्यावर शिवराय आले, गरज आहे या काळात अशाच वीरांची . मल्लाचा पराभव केल्या नंतर मरताना मल्ल राक्षसाने माझे नाव आपल्यात घ्यावे अशी विनंती केल्यावर खंडेराया मल्हारी या नावाने सुद्धा ...

रामराज्य आणि आजचा भारत भाग 2

          मित्रांनो आजच्या या युगात Technology  मुळे सर्व गोष्टी पटकन आपल्याला मिळतात. क्षणार्धात विमानामुळे दूर देशी जाता येते. फोनवर सुद्धा दूर देशी बसलेल्या मित्राशी पटकन बोलता येते .         पण या सर्व गोष्टी मानवाने भोग आणि चंचल मनाला पटकन मिळाव्यात म्हणून केल्या आहेत ,एका बाजूने या गोष्टी बरोबर तर आहे. पण दुसऱ्या बाजूने अनेक वाईट परिणाम पहावे लागत आहे.        रामराज्य म्हणजे त्रेतायुगात रामाचा आदर्श ठेऊन सर्व राहत होते. राम स्वतः मर्यादा पुरुषोत्तम होते. शांतपणा ,विवेक, धेंर्य ,नेतृत्व, युद्धकोशल्य हे गुण रामाचे जसे इंद्रियच होते.         पण आजच्या कलियुग कालावधीत मर्यादा, संयम शांतपणा, विवेक हे गुण तर सोडाच ,पण अनेक मानसिक आजार वाढत आहे. चंचलता, आणि पटकन मिळवण्याच्या लोभात अनेक वाईट काम करण्यास आज माणूस मागे पुढे पाहत नाही ये .         रामराज्यात आजार कमी होते ,लोक शक्तीशाली होते .नाती, नीती आणि पारंपरिक गोष्टीचे पालन करत, लोक सतत कार्यात असत ,धार्मिक गोष्टीना मान देत ...

दिवाळी आणि रामराज्य भाग 1

              सोशियल मीडियाच्या या जगात दूर देशी बसलेला मित्र नक्की जवळ आला आहे. पण जवळची नाती आणि रीत, परंपरा मात्र दूर जात आहे. मुळात दिवाळी साजरी का केली जाते, साजरी करण्याचा खरा अर्थ काय हे पुढील माहिती वरून लक्षात येईलच.              श्री रामांचा १४ वर्षाचा वनवास संपल्याव माता सीता, लक्षुमन, हनुमान सहित अयोध्येत आले, या १४ वर्षाच्या वनवासात श्रीराम व माता सीतेला अनेक कष्ट सोसावे लागले.           (अयोध्या आपले शरीर श्रीराम आपल्या मनातील निश्चय माता सीता चरित्र लक्षुमन  वैराग्य व हनुमान भक्ती आपल्या मध्ये येण्यासाठी श्री राम प्रमाणे अनेक कष्ट सोसावे लागतात.           अयोध्येतील जनता श्री राम अयोध्येत १४ वर्षांचा वनवास संपल्यावर आले, म्हणजेच मोठी वाट पहिल्या नंतर राम राज्य आले म्हणून सर्व जनतेने दिवाळी साजरी केली .दिवाळी म्हणजे रोषणाई,रामराज्य, आनंद ,आणि सुख भरत तर राम १४ वर्षा नंतर न आल्यावर मृत्यूला सामोरे जाणार होता).         (अयोध्येत...

श्री रामानी युद्धासाठी बाली पेक्षा सुग्रीवाची निवड का केली ?

          कोणतेही मोठे लक्ष जर प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी योग्य साथीदारांची साथ असणे गरजेचे आहे. कारण अंतर्गत मतभेद ,अविश्वास आणि फक्त स्वार्थ साधणारे मित्र परिवार जर सोबत असेल ,तर बाहेरील दुष्मणाशी लढून उपयोग तो काय ? पण जर आपण अनेक भारतीय वीरांचा जर विचार केला, तर त्यांनी निस्वार्थ साथीदारांची आणि योद्धाचीच निवड केली आहे.             श्री रामाचा जर विचार केला ,तर त्यांनी बाली पेक्षा सुग्रीवाची निवड केली. पण पौराणिक कथा मध्ये जर पाहिले, तर बालीने रावणाला शेपटीला बांधून सात समुद्रात स्नान केले होते. खरे पाहता बाली कडे शक्ती होती ,की त्याचे आणि त्याच्या विरोधकांचे युद्ध करताना नेत्र एकत्रित झाले ,तर सर्व वेरोधकाची शक्ती बाली मध्ये येत होती. सात विविध स्थानावर असणाऱ्या झाडाना एका बानात भेदनाऱ्याच्या हातून बालीचा वध होणार होता इतक्या शक्ती शालीबालीला सोडून श्रीरामांनी बाली कडून मार खाऊन पळालेल्या बालीचा लहाना भाऊ सुग्रीवाची मदत घेतली या मागील कारण होते ते विवेकी विचार धारेचे.            बाली  आणि...

दृष्टा विरुद्ध लढणाऱ्या दुर्गा मातेकडून घ्या हे पाच मौल्यवान गुण

            महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले.   त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे- १.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध          दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.   २.अशक्य गोष्टीस योजना_          महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला...

शिवरायांनी ,जिजाऊंनी आणि दादोजींनी या युक्तीने आणि योजनेने वसवले उद्वस्त पुणे

             आजच्या सरकारला आहे, ते रस्ते आणि आहे त्या सरकारी वास्तू ( शाळा, दवाखान .इ) निट व्यवस्थित ठेवता येत नाहीत. आणि शिवरायांनी तर उद्वस्त पुणे वसवले आणि शिवरायांनी याच पुण्यातून स्वराज्याची सुरुवात केली.              शाहजीराजे यांनी जेव्हा आदिलशाही विरुद्ध बंड पुकारला तेव्हा तो मोडूनन काढण्यात आला. त्यानंतर मुरार जगदेवणे आदिलशहाच्या आदेशाने पूर्ण पुणे उध्वस्त केले.            शिवरायांना पुण्याची जहागीर मिळाली .त्यावेळी पुण्यातील सर्व जनता इतर प्रदेशात निघून गेली होती आणि जी होती तीही दऱ्या खोऱ्या मध्ये लपलेली होती. या सर्वांना शिवरायांनी आणि दादोजींना रक्षणाचा भरोसा देऊन पुणे वासवण्यास सुरुवात केली.              सुरुवातीलाच त्यांना गणरायाचा कौल घडला. ज्या ठिकाणी शिवरायांच्या लाल महालाचे काम करीत होते. त्या ठिकाणी गणरायाची मूर्ती सापडली हे ऐकताच प्रजा जमू लागली .           १.सोन्याचा नांगर सोन्या सारखे पीक     ...

शिवरायांना ही स्वराज्याच्या सुरवातीला ऐकावे लागले होते नकारात्मक बोल,

              ज्या वेळी स्वहीत सोडून समाजहित करण्यासाठी सुरुवात करतो, त्यावेळी आपण सुरुवातिच्या स्तरावर असतो, पूर्ण यश मिळेलच नसते, त्यामुळे इतरांकडून अनेक वेळा नकारात्मक ( negativeness) बोल ऐकावे लागतात.               असेच काही शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या स्थरावर ऐकावे लागले होते.              ज्यावेळी शिवरायांनी तोरणा जिंकला त्यावेळी त्यांच्या जवळ फारच थोडे धन होते .आणि नुकतेच पुणे बसवले होते. त्यामुळे अधिक कर ही गोळा होत नसे.            दादोजी कोंडदेव आणि शिवरायांचे पंत हे शहाजीराज्यांचे विश्वासु लोक, शहाजीराज्यांचा बंडावा आदिलशहाने मोडून काढला होता. तसाच शिवरयांचाही स्वराज्याचे स्वप्न आदिलशहा मोडून काढतो की काय अशी भीती दादोजींना आणि पंताना होती.           पंत एकदा शिवरायाना म्हणाले ही होते, की तुम्ही जी स्वराज्याची सुरुवात केली आहे ती सुरुवात जेव्हा शहाजी राज्यांनी केली होती. त्यावेळी त्यांनाही पराजयचा ...

तोरणावरील खजिना, 'शिवरायांचे नशीब की आई भवानीचा आशीर्वाद'

             कोणाच्याही आयुष्यात यश येण्यासाठी महत्वाची असते ती जिद्द चिकाटी आणि कष्ट पण काही वेळा असे प्रसंग तयार होतात, की त्यावेळी नशिबाची किंवा भगवंत आशीर्वादा ची गरज असते. खर तर भगवंत चांगले कर्म करणाऱ्यांच्या पाठीशी उभाच असतो .           शिवरायही जुलुमी आदिलशाही विरुद्ध जेव्हा युद्ध पुकारले तेव्हा सुरुवातीला च अनेक संकटे आली ,त्यातील एक होते ते आर्थिक पाठबळ नसल्याचे संकट. शिवरायांनी जेव्हा तोरणा किल्ला जिंखला, त्यावेळी तोरणा किल्याचे बांधकाम करताना शिवरायांना आर्थिक टंचाई जाणवली. त्यांचे मन निराश झाले ,त्यांना विचार येऊ लगले की पुढील माहिम किल्याचे कामे सेनेचे पगार असे अनेक चिंता जाणवू लागल्या ,पण जिजाऊंनी त्यांना धिर दिला व म्हणाल्या की आई भवानी सर्व ठीक करील, आणि तेच बोल खरे ठरले तोरणा किल्याचे बांधकाम कसेबसे चालू होते खोदकाम करताना खजिना सापडला शिवरायांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी पुढील महिमेकडे लक्ष केंद्रित केले.            मग आता प्रश्न हा उभा राहतो ,की शिवरायांनी नशिबावर विश्वास ठेवला...

शिवराय समभाजींच्या जन्मापासून संकटाची वर्दळ भाग 2

          या आधीच्या भागात आपण शिवरायांच्या जन्मकाळावधी पासून संकटांची वर्दळ पहिली, या भागात आपण संभाजी महाराजांच्या ही जन्म कालावधी पासून संकटांची वर्दळ होती ,ती पुढील मुद्यांवरून पाहू- १. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर या किल्यावर झाला. आणि स्वराज्याला छावा मिळाला. पण वीरांच्या आयुष्यात जन्मापासूनच संकटे जशी त्यांची परीक्षाच पाहतात.    २. सर्वात मोठं संकट म्हणजेच अफजलखान ज्यावेळी शिवरायांवर चालून आला त्याच वेळी संभाजी राजे नुकतेच ४ महिन्यांचे झाले होते, आणि याच कालावधीत अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला होता, आणि शिवरायांचा मुलुख बेचराख करत चालला होता .           आणि सँभाजी महाराजांचे मामा बजाजी निंबाळकर हे अफजलखानाच्या कैदेत अडकले होते.       ३ .आणि त्याच कालावधीत सँभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई या आजारी होत्या. त्यामुळे संभाजी राजेंना पुरेसे दूध भेटत नव्हते, त्यामुळे त्यांच्यासाठी दाईची व्यवस्था करण्यात आली होती.        ४. आणि याच कालावधीत सँभाजी राजेंच्या मातोश्र...

शिवराय, संभाजीराजेंच्या जन्मापासूनच संकटांची वर्दळ भाग 1

               शिवराय आणि संभाजीराजे यांच्या जन्म कालावधी पासून जर पाहिले तर संकटंचा आणि दुःखाचा च होता. असे दिसून येते प्रथम शिवरायांचे जर पाहिले तर त्यांच्या जन्माच्या वेळी जिजाऊंच्या सासर आणि माहेर यामध्ये संघर्ष सुरू झाला होता. या संघर्षा मध्ये त्यांचे अनेक आप्तजन मारले गेले होते . आणि त्याच कालावधीत शहाजी राजांनी आदिलशाहीशी बंडावा केला आणि त्या युध्दात शहाजी राजे हरले गेले. आणि आदिलशाहीतील आपलेच काही मराठे सरदार जे शहाजी राजांवर जळत होते त्यांनी शहाजीराजांच्या जवळील सरदारांना फितवण्यास सुरुवात केली त्यामुळे गर्भवती जिजाऊंना आपल्या कोणत्या विश्वासु सरदारांवराकडे देखभाल करण्याआधी ढेवावे हे कळेना त्या नंतर आपला सर्वात जवळचा मित्र विश्वासराव जे शिवनेरी किल्याचे सरदार होते( शेवटी तोही पर मुलुख) पण विश्वास रावांनी मात्र आपल्या भगिनी प्रमाणे जिजाऊंना सांभाळले. ( संकटाच्या काळात जो मित्र कामी येतो तोच खरा मित्र).             मित्रांनो फक्त जन्माच्या कालावधीतच नाही तर त्यानंतर बाल्य अवस्थेततही  वीरांन पुणे शिवरायांना...

शहाजीराजांचे आज्ञाधारक पुत्र शिवराय

               प्रत्येक पित्याला वाटते की आपल्या पुत्राने आपल्या आज्ञात रहावे. पण शिवराय असे कसे की ज्या वेळी आदिलशहाने शहाजीराजांना कपटाने कैद केले, आणि त्यांना खाल्या मिठाची आन देऊन बळजबरीने शिवरायांना सर्व जिंखलेले किल्ले देऊन समर्पण करण्यास ये असा मजकूर लिहिण्यास शहाजीराजांना सांगितले. आणि नाईलाजाने शहाजीराजांना ही तसे करावे लागले. आणि एवढे शहाजीराजांचे पत्र आल्यावरही शिवरायांनी आपले हल्ले आदिलशाही किल्यावर चालूच ठेवले. त्याचे कारण असे होते की, शहाजीराजांना ही आंतरिक मनातून शिवरायांच्या कार्याचे कौतुक वाटत होते. व ते आशीर्वाद ही देत होते.  कारण जे शहाजीराजांना करायचे होते. पण फंद फितुरीमुळे झाले नाही ते स्वराज्याचे स्वप्न आपला पुत्र करत होता ,याचा त्यांना अभिमानच होता. आणि शिवराय मनातून हे जाणतच होते. आणि शहाजी राजांनी ही त्या पत्रातून सांकेतिक भाषेत शिवरायांना आदेशच दिला होता.            शिवराय किती आज्ञाधारक होते याचे अजून एक उदाहरण म्हणजे ज्यावेळी नेस्तनाबूत झालेले पुणे शिवरायांना पुन्हा बसवायला सांगितले...

शिवरायांचे निस्वार्थी मित्र परिवार

  शिवरायांचे निस्वार्थी मित्र परिवार              जीवनात जर मोठे कार्य सम्पन करायचे असेल तर आपल्याला निस्वार्थी आणि त्यागी मित्र बनवणे गरजेचे आहे. संकटाच्या प्रत्येक पावलावर साथ देणारे मित्र  मिळवणे गरजेचे आहे. शिवरायांनी बारा मावळातून अनेक मित्र मिळवले ,आणि शिवरायांचा मित्र परिवार स्वराज्याच्या संकट काळात शिवरायांसाठी मर मिटायला ही तयार होता. स्वराज्या साठी शिवरायांनी कसे मित्र निवडले ते पुढील मुद्यांवरून लक्षातच येईल.  योग्य मित्राची निवड                  शिवरायांच्या मित्र परिवारात जर पाहिले तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा हिंदू मुस्लिम जातीचा भेदभाव केलेला आढळत नाही.फक्त मातृभूमी साठी ज्यांच्या मनात तीव्र इच्छा आहे जे स्वतःच्या प्रणापेक्षा स्वराज्यासाठी बलिदान देण्यास तयार होते असा सर्व मित्र परिवारा कडे शिवराय आकर्षित होताना दिसून येतात . कारण शिवरायांनचे विचारही त्याच प्रकारचे होते, एक प्रकारे शिवरायांनी वर्ण धर्म यांच्या पेक्षा विचार धारेला महत्व दिले म्हणजेच बाय्य गुना पेक्षा आंतर...

सावित्रीबाई फुले इतिहासातील एक उत्कृष्ट शिक्षक

  सावित्रीबाई फुले इतिहासातील एक उत्कृष्ट शिक्षक                 मित्रानो इतिहासात नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जावे व ते  पुढील पिढीने आदर्श मानून प्रेरित होणे गरजेचे आहे पण इतिहासात नाव कोरने काही सोपी गोष्ट नाही सावित्री बाईंनी इतिहासात नाव कोरले जावे म्हणून काही हट्टहास धरला नव्हता समाजाचे हित इच्छुन त्यांनी कार्य केले पण समाजाचे हित करताना व त्याच समाजापुढे इतिहासात नाव कोरले जाताना त्यांना अनेक कष्ट सहन करावे लागले ते पूढील काही मुद्यांवरून लक्षात च येईल अशी ही सावित्रीबाईची शिक्षणाची आवड        बालपणापासून च शिक्षणाची आवड  असणाऱ्या सावित्रीबाईंच्या कालावधीत स्त्री ला शिक्षण दिले जात नव्हते.तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही.त्या पुस्तकांना आपला गुरू मनात व त्यांना त्या जपत. पण आजच्या कालावधीत जर पाहिले तर सर्व उपलब्ध असूनही आजच्या कालावधीतील सावित्री (मुली) सोशिअल मीडियावर गुंतल्या आहे  जहाँ चाह वहा राह  शिक्षणाची आवड असणाऱ्या सावित्रीबाई ना जोतिरावसारखे व्यक्तिमहत्व शिक्षक स्वरूपात मिळाले व त्यांनी ...

गणरायाचे विवेकबुद्धी व शांतपण हे अतुलनीय गुण

 गणरायाचे विवेकबुद्धी व शांतपण हे अतुलनीय गुण  अगोदर च्या भागात गणरायाच्या चातुर्य या गुणाचा मागोवा घेतला या भागात आपण विवेक बुद्धी व शांतपणा या गुणांचा मागोवा घेऊ  - विवेक बुद्धी या गुणांचा आपल्या जीवनात असामान्य महत्व आहे .आपली बुद्धी विवेकी स्थिर ,व परस्थितीनुसार निर्णय करणारी असेल तर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. क्रोध नियंत्रित करू शकतो हे पुढील कथेवरून लक्षातच येईल-           ती कथा आपल्या सर्वानाच माहित आहे .जेव्हा देवानं वादविवाद सुरु  झाला, कि प्रथम पूजनाचा मान कोन्हाला याचे उत्तर म्हणून ब्रम्हदेवाने स्पर्धा आयोजित केली, कि जो कोण्ही संपूर्ण ब्रम्हांडाला चक्कर मारिल तो विजयी . मातापार्वतीनी गणराया व कार्तिकेय या दोघांना या स्पर्धेत भाग घेण्यास सांगितल. या ठिकाणी गणरायाचे वाहन मूषक होते तरीही गणरायाने भाग घेतला. जेव्हा स्पर्धा सुरु झाली तेव्हा गणराया सर्वात मागे होते .तरीही गणरायाने योग्य निर्णय घेत आपले मातापिता यांना चक्कर मारला .जेव्हा याचे कारण गणरायाला विचारले तेव्हा गणरायाणे सांगितले कि जर मातापित्यातच जर सम्पूर्ण ब...

गणपती बाप्पा चा चातुर्य हा एक गुण

  गणपती बाप्पा चा चातुर्य हा एक गुण  गणपती बाप्पा ही ज्ञानाची, बुद्धीची,शक्तीची, व आरोग्याची देवता आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे आपण गणरायकडून अनेक गुण घेऊ शकतो.चातुर्य हा त्या पैकी एक .तो गुण पुढील काही उदाहरणावरून लक्षातच येईल.   पुराणात अनेक कथा गणरायाच्या बुद्धीचे व चतुर्याचे वर्णन करतात -          ती एक कथा तर सर्वानाच माहीत असेल, ज्यावेळी गणरायावर जेव्हा साडेसाती म्हणजेच शनी ग्रह लागणार होता. त्यावेळी शनी देव गणरायाकडे निघाले.ही गोष्ट जेव्हा गणरायाला कळाली तेव्हा गणरायाने एक युक्ती लढवली, व शनी देव ज्या मार्गाने येत होता त्या मार्गावर  जिते तिथ लिहून ठेवले की "उद्या या " .गणपती हे देवाचे प्रमुख असल्याने त्यांच्या या विनंतीला शनिदेव मान देत दुसऱ्या दिवशी आले. पण दुसऱ्याची दिवशी तसेच लिहिले असल्याने त्यांना परत जावे लागले. शनी देव जेव्हा गणरायकडे येतात त्यावेळी त्यांना हेच वाचण्यास मिळते. त्यामुळे सर्व देवांमध्ये  फक्त गणपती (व हनुमान )यांना शनिग्रह लागत नाही .            गणरायाच्या बुद्धी चातुर्याम...

शिवरायांचे बालपणीचे शिक्षण

 शिवरायांचे बालपणीचे शिक्षण  शिवराय हे छत्रपती झाले असतील तर त्या मागे त्यांच्या प्रशिक्षणाचा नक्किच मोठा वाटा आहे हे पुढील काही मुद्यांवरून आढळून येते- प्रात्यक्षित पद्धतीचे शिक्षण (Practical knowledge)           शिवरायांच्या कालावधीत शिक्षण हे मुख्य करून प्रात्यक्षिक पध्दतीचे होते. असे आढळून येते या कालावधीतील विद्यार्थ्यांना युद्ध कला जसे  तालावरबाजी, दांडपट्टा, घोड्यावर रपेट मारणे अशा विविध कला शिकवल्या जात.             आजच्या कालावधीत प्रात्यक्षित पद्धतीचे शिक्षण खुप कमी दिसून येते. १ तासाच्या आत शिकवलेला विषय जीवनात कोठे उपयोगी पडू शकतो हे काही वेळा शिक्षक सांगत नाही, तर विद्यार्थी ही समजून घेत नाही शिवाय पाण्यात पडल्या शिवाय पोहता कसे काय येईल . संघ व वयक्तिक पद्धतीचे शिक्षण          संघ पद्धतीने म्हणजे एकत्र जसे शिवरायांचे शिक्षक गुरू दादाजी कोंडदेव  हे शिवरायांना त्याच बरोबर मावळ्यांना आणि शिवरायांच्या सवंगड्याना एक सोबत व वयक्तिक शिक्षण देत असे पण त्यांच्या शिस्तीत मात्र थोडा सु...

भारतीय स्वातंत्र्य विरांच्या (क्रांतिकारकांच्या) कथा

  भारतीय स्वातंत्र्य विरांच्या (क्रांतिकारकांच्या) कथा  आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक स्वातंत्र्य विरांपासून यशाचे काही धडे घेऊ शकतो - 1. आर्थिक संकट           अनेक क्रांतिकारक हे गरीब व आर्थिक टंचाईतलेच होते. घरामध्ये अनेक आर्थिक अडचणी ही होत्या, पण त्यांना आर्थिक श्रीमंती पेक्षा देशाचे स्वातंत्र्य महत्वाचे होते. मग त्यामध्ये लोकमान्य टिळक असतील चंद्रशेखर आझाद असतील भगतसिंग असेल किंवा सुभाषचंद्र बोस असतील, सुभाषचंद्रानि देशासाठी कलेक्टर पद सोडलं   यावरून महत्वाच्या गोष्टीसाठी कोणताही मोह सोडावा हे लक्ष्यात येते, तर अनेक आर्थिक अडचनीणा कसे सामोरे जावे हे आपण स्वातंत्र्य वीरांकडून शिकतो.  (तोरणा जिंकल्यावर शिवरायानं समोर अनेक आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले होते पण त्याच वेळी तोरणा किल्यावर सोन्याचे घडे सापडले ) 2.कठीण परिथितील विजय          स्वातंत्र्य विरांसमोर अनेक संकट होती ठीक ठिकाणी इंग्रजचे गुप्तचर होते, त्यात भारतातलेच अनेक शिपाई होते, संदेश पाठवण्यास क्रांतीकारकांना अनेक अडचणनी आल्या प...

श्री कृष्णा च्या बालपणीचे वैशिष्ट्य व गुण

  श्री कृष्णा च्या बालपणीचे वैशिष्ट्य व गुण  श्री कृष्णांच्या बाळपणापासून अनेक गुण घेऊ शकतो जसे की - 1.श्रीकृष्णाचा जन्मच कारागृहात झाला. मामा वैरी तर आई वडील बंधिस्त म्हणजेच संकटाची सुरुवातच जन्मापासूनच झाली होती. पण नियतीला तेथे काही वेगळेच घडवायचे होते. त्यामुळेच श्री कृष्ण कारागृहातून मूक्त होऊन नंदराजाच्या घरी पोहचले  आपल्याही आयुष्यात पहिले तर आपलाही जन्म गरीब किंवा श्रीमंत परिवारात झाला आहे, याचा विचार न करता आपल लक्ष्य  काय आहे, विचार करण महत्वाचे आहे.  (शिवाजीमहाराजांचा जन्मही दुःखाच्या परिस्थितीत शिवनेरीवर झाला होता.) 2.श्री कृष्ण हे देव आहे. पण जर आपण त्यांच्याकडे एका मित्रा प्रमाणे पहिले तर अनेक गुण हेऊ शकतो. जसे की श्री कृष्णाने बालपणीच अनेक राक्षसांचा वध केला होता   आपल्याही आयुष्यात अनेक संकट येतात पण आपल्या क्षमते नुसार त्यांचा सामना केला तर आपले ही आयुष्य ठरलेल्या लक्ष्या पर्यंत जाऊन पोहचेल.  3.श्री कृष्णा लहानपणापासूनच नटखट खोडकर आनंदी व उत्साहित होते पण तेवढेच माता यशोदेचे आज्ञाकारी ही होते.  आपणही बालपणात खोडकर असतो पण तेवढेच आ...

शिवरायांचा तोरणा विजय

शिवरायांचा तोरणा विजय  शिवरायांनी तोरणा जिंखन्यासाठी ज्या योजना वापरल्या त्या अतुलनीय होत्या. वयाच्या फक्त अठराव्या वर्षीं त्यांनी हा गढ  जिंखला. (आणि आजच्या या वयातील मुलांचा विचार केलातर या वयातील मुलं दहावी बारावी ची परीक्षाच देत असतात.)  शिवरायांनी गढावर चढाई करण्यापूर्वी अनेक मुख्य आणि महत्वाच्या बाबींचा विचार केला होता, असेच दिसून येते,पुढील मुद्यावरून ते लक्ष्यातच येईल. गडाची ओळख  शिवरायांनी गुप्तचरांच्या माध्यमातून गडावरील संपूर्ण माहिती मिळवली होती. स्वतः रूप पालटून गडावरील माहिती मिळवली. गड प्रमुखाच्या गोटात शिवरायांचे गुप्तचर जाऊन पोहोचलो होते. गडावरील पूर्ण तपशील मिळाल्या नंतरच शिवरायांनी पुढील योजना आखली.असे दिसून येते.  गाडावरील नाजूक भागांचा शोध  शिवरायांनी गडावरील सर्वप्रथम नाजूक भागांचा शोध घेतला. (नक्कीच एका योध्याने आपल्या शत्रूच्या नाजुक भागांचा शोध घेणं महत्वाच असत व तेच येथे शिवरायांनी केले).  सैनिकांचे नियोजन   शिवरायांनी चाणाक्ष लढाऊ व चपळ मोजक्या सैनिकांची निवड केली (यावरून कोणत्याही युद्धाचा परिणाम सैनिकांच्या संख्येवरून ...

शिवरायांच्या बालपणीचे गुण

शिवरायांचे बालपण  शिवरायांच्या बालपनाचा विचार करण्यापूर्वी जिजाऊचां विचार करणं महत्वाचं आहे  जिजाऊंनी लहानपनीच शिवरायांना  रामायण महाभारतल्या कथा सांगीतल्या ( पण आजचा विचार केला तर पालकांना मुलांशी बोलण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये) शिवरायांचे लहानपणापासूनच युध्द कलेचे प्रशिक्षण सुरु झाले होते  . (पण आजचा विचार केलातर मुलांचा जास्त वेळ मोबाईल टीव्ही वरच जातोय) शिवराय लहानपणापासूनच उत्साही होते नवीन गोष्टी शिकण्यासाठी दूरवर फिरत गड किल्ले पाहत मित्र बनवट नवीन डावपेच शिकत. ( पण आजचा विचार केलातर युवकांमध्ये उत्साह नाही घरात मोबाइला चटकून राहतात) शिवराय बालपनापासून स्वराज्याचा विचार करत होते.   ( पण आजचे तरुण नोकरीचाच विचार करतोय ) शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच शरीराबरोबर मन व बुद्धीलाही बळकट केलं  (पण आजचा तरुण शरीर तर बळकट बनवतोय पण मन विवेकी बनवट नाहीये). शिवराय सात भाषेत प्रवीण होते अनेक युद्धकला गणित ग्रंथात प्रवीण होते.   ( पण आजचा तरुण दहावी पास करण्याआधी सुद्धा कॉप्या करतोय) वरील मत खर असेल तर खाली कंमेन्ट करा.