जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
मित्रांनो आजच्या या युगात Technology मुळे सर्व गोष्टी पटकन आपल्याला मिळतात. क्षणार्धात विमानामुळे दूर देशी जाता येते. फोनवर सुद्धा दूर देशी बसलेल्या मित्राशी पटकन बोलता येते . पण या सर्व गोष्टी मानवाने भोग आणि चंचल मनाला पटकन मिळाव्यात म्हणून केल्या आहेत ,एका बाजूने या गोष्टी बरोबर तर आहे. पण दुसऱ्या बाजूने अनेक वाईट परिणाम पहावे लागत आहे. रामराज्य म्हणजे त्रेतायुगात रामाचा आदर्श ठेऊन सर्व राहत होते. राम स्वतः मर्यादा पुरुषोत्तम होते. शांतपणा ,विवेक, धेंर्य ,नेतृत्व, युद्धकोशल्य हे गुण रामाचे जसे इंद्रियच होते. पण आजच्या कलियुग कालावधीत मर्यादा, संयम शांतपणा, विवेक हे गुण तर सोडाच ,पण अनेक मानसिक आजार वाढत आहे. चंचलता, आणि पटकन मिळवण्याच्या लोभात अनेक वाईट काम करण्यास आज माणूस मागे पुढे पाहत नाही ये . रामराज्यात आजार कमी होते ,लोक शक्तीशाली होते .नाती, नीती आणि पारंपरिक गोष्टीचे पालन करत, लोक सतत कार्यात असत ,धार्मिक गोष्टीना मान देत ...